एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO | पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची व्यक्तिरेखा साकारणार असून बोमन इराणी, झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन या कलाकारांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे. लहान मुलापासून पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी विवेक ओबेरॉयसह दिग्दर्शक, चित्रपटातील इतर कलाकार आणि क्रू सदस्य उपस्थित होते.
नरेंद्र मोदींच्या बायोपिकमधील जशोदाबेन यांच्या व्यक्तिरेखेबाबतचा सस्पेन्स संपला, 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत
विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची व्यक्तिरेखा साकारणार असून बोमन इराणी, झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन या कलाकारांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे.
सरबजीत, मेरी कोम यांसारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर संदीप सिंह सिनेमाचे निर्माते आहेत. तसंच विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय हे देखील निर्मित्यांपैकी एक आहेत.
नरेंद्र मोदींवर चित्रपट, विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत!
पाहा ट्रेलर
पंतप्रधान मोदींचा बायोपिक आधी 12 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता हा चित्रपट 5 एप्रिलला प्रदर्शित होईल. म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच हा चित्रपट थिएटरमध्ये झळकेल.
मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील कोणकोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकला जाणार, हे 5 एप्रिलला स्पष्ट होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा फर्स्ट लूक रिलीज
बॉलिवूडमधील गेल्या काही वर्षांत गाजलेले बायोपिक
भाग मिल्खा भाग - धावपटू मिल्खासिंग
एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी - क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी
नीरजा - दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोत
मेरी कोम - बॉक्सर मेरी कोम
द डर्टी पिक्चर - दाक्षिणात्य स्टार सिल्क स्मिता
पान सिंग तोमर - धावपटू पान सिंग तोमर
बँडिट क्वीन - फूलन देवी
दंगल - कुस्तीपटू फोगट भगिनी
नेताजी सुभाषचंद्र बोस : अ फरगॉटन हिरो - नेताजी सुभाषचंद्र बोस
सरबजीत - पाकिस्तानच्या तुरुंगातील भारतीय कैदी सरबजीत
मांझी : द माऊंटन मॅन - दशरथ मांझी
हसीना पारकर - हसीना पारकर
पॅडमॅन - अरुणाचलम मुरुगनंथम
गली बॉईज - मुंबईतील रॅपर डिवाईन
संजू- संजय दत्त
मोदींच्या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा उत्तम कोणीच नाही : परेश रावल
आगामी बायोपिक
तानाजी - तानाजी मालुसरे
मणिकर्णिका - राणी लक्ष्मीबाई
मोगल - गुलशन कुमार
सुपर 30 - गणितज्ज्ञ आनंद कुमार
केसरी - साराग्रही संग्रामातील हवलदार इशर सिंग
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू
फुलराणी सायना नेहवाल
पॉर्नस्टार शकीला
अंतराळवीर राकेश शर्मा
मोदींच्या बायोपिकमध्ये अमित शाहांच्या भूमिकेतील 'या' अभिनेत्याला ओळखलंत?
मराठीमधील बायोपिक
बालगंधर्व - बालगंधर्व
लोकमान्य - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
एक अलबेला - भगवानदादा
...आणि डॉ काशिनाथ घाणेकर- अभिनेते डॉ काशिनाथ घाणेकर
प्रकाश बाबा आमटे - लोकनेते प्रकाश बाबा आमटे
भाई- व्यक्ती की वल्ली - पु. ल. देशपांडे
येल्लो - डाऊन सिंड्रोमग्रस्त स्विमर गौरी गाडगीळ
ठाकरे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement