(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
केतकी चितळेला तूर्तास दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक करणार नाही
आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिच्याबद्दल राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. पण तूर्तास केतकीला दिलासा मिळाला आहे.
आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नुकताच आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
'दादा एक गुड न्यूज आहे' नाटकाने पार केला 250 प्रयोगांचा टप्पा; प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत. या नाटकात हृता दुर्गुळे आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या नाटकाने 250 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे.
कतरिना कैफच्या 'फोन भूत'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ विकी कौशलसोबत 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर कतरिनाचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. अशातच आता कतरिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी 'फोन भूत' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
असामच्या Nobojit Narzary नं जिंकला डीआयडी लिटिल मास्टर सीजन-5 चा किताब
डान्स रिअॅलिटी शो डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 संपला आहे. नोबोजित नरझरी यानं डीआयडी लिटल मास्टर 5 चं विजेतेपद पटकावलं आहे. आसाममध्ये राहणार्या 8 वर्षीय नोबोजित नरझारीने सर्व स्पर्धकांना मागे टाकत डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. नोबोजितला बक्षीस म्हणून 5 लाख रुपयेही मिळाले. डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 च्या ग्रँड फिनालेसाठी जुग जुग जिओची स्टार कास्ट उपस्थित होती.
'आपला सिद्धू' बनला गायक; ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘मेल्याहून मेल्यागत’ गाणं रिलीज
संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह’ हा सिनेमा म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे. सध्या या सिनेमातील एक-एक पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेमगीत आणि रॅप साँगनंतर आता ‘मेल्याहून मेल्यागत’ हे सिद्धार्थ जाधववर चित्रीत गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
आधी बाहेरचा रस्ता...नंतर माफी मागत निर्मात्यांनी जॉनी डेपला केली पुन्हा विचारणा; दिली भन्नाट ऑफर
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पूर्व पत्नी एम्बर हडपने केलेल्या आरोपांमुळे जॉनी डेपला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. या आरोपांमुळे त्याच्या हातातील सर्व कामं काढून घेण्यात आली होती. तसेच डिज्नीची लोकप्रिय सीरिज 'पायरट्स ऑफ कॅरेबियन'मधूनदेखील त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण आता याच सीरिजसाठी जॉनी डेपला पुन्हा विचारणा झाली आहे.
'राडा राडा'च्या माध्यमातून प्राजक्ता माळी करणार 'बलात्कार संस्कृती'वर भाष्य
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य करत असते. लवकरच ती 'राडा राडा' या टॉक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय बलात्कार संस्कृतीविषयी भाष्य करणाऱ्या या टॉक शोची धुरा प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे सांभाळणार आहे.
पहिल्या आठवड्यात 'जुग जुग जियो'ची बॉक्स ऑफिसवर जादू; जाणून घ्या कलेक्शन
जुग जुग जियो या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा आडवाणी आणि वरुण धवन यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं आत्तापर्यंत 36 कोटींची कमाई केली आहे.
आलिया लंडनमध्ये करतेय हॉलिवूडच्या सिनेमाचे शूटिंग
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज पुन्हा एकदा आलिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आज सकाळीच आलियाने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहून्याचे आगमन होणार असल्याने चाहतेदेखील आनंदी झाले आहेत.
संबंधित बातम्या