Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नेहा जिंकली 100 कोटींचं डिल; सिम्मीची होणार फजिती
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत नेहाने 100 कोटींचं डिल यशस्वीपणे जिंकलं आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. यश-नेहा नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नेहा-यशचा सुखी संसार नुकताच सुरू झाला आहे. अशातच नेहाने 100 कोटींचं डिल जिंकलं आहे.
यश-नेहाच्या लग्नानंतर यशच्या आजोबांनी नेहाच्या खांद्यावर एक विशेष जबाबदारी सोपवली. आजोबांनी नेहावर कंपनीची जबाबदारी सोपवली. नेहाकडे पहिलीच जबाबदारी 100 कोटींचं डिल जिंकण्याची होती. त्याप्रमाणे नेहा यशस्वीपणे 100 कोटींचं डिल जिंकली आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात पॅलेसवरील सर्व मंडळी नेहाचे कौतुक करताना दिसणार आहेत.
सिम्मीची होणार मोठी फजिती
नेहा 100 कोटीचं डिल जिंकू नये यासाठी सिम्मी काकूने अनेक प्रयत्न केले होते. नेहाने रात्रभर जागून बनवलेले प्रेझेंटेशन सिम्मी काकूने डीलीट केले होते. तसेच या प्रेझेंटेशन जागी नेहा-यशचा लग्नाचा व्हिडीओ टाकला होता. पण नेहाने त्या प्रेझेंटेशनचा चांगला अभ्यास केल्याने सिम्मी काकूच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे सिम्मी काकूची चांगलीच फजिती झाली.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत येणार नवं वळण
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत आता नवं वळण येणार आहे. मालिकेत आता अविनाश परीचा ड्रायव्हर म्हणून दिसणार आहे. परीला तिच्या खऱ्या वडिलांची ओळख पटणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अविनाश पॅलेसवर आल्यामुळे मालिकेत एक नवं नाट्य सुरू होणार आहे. अविनाशच्या मदतीने सिम्मी काकू नवी खेळी खेळणार का? असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या