एक्स्प्लोर

शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ आज दुपारच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. त्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जखमी झाल्याची माहिती आहे.

नाशिक : देशातील रस्तेमार्गाचे विस्तारीकरण होत आहे, अनेक नवीन महामार्ग बांधले जात आहेत. त्याच तुलनेने वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, वाढतं दळणवळण हे वाढत्या अपघातांचे (Accident) कारण बनत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत खंत व्यक्त केली होती. मात्र, रस्ते अपघातात अनेकांचे जीव जात असल्याच्या दुर्दैवी घटना कमी होताना दिसून येत नाहीत. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेल्या समृद्धी महामार्गाचे (Samruddhi mahamarg) लोकार्पण झाले, तो महामार्ग नागरिकांसाठी सुरूही झाला. पण, या महामार्गावरील अपघात हा चर्चेचा आणि गंभीर विषय बनला आहे. सध्या नागपूर ते मुंबई महामार्गावरील काही काम बाकी आहे. तरीही मोठ्या प्रमाणातून महामार्गावरुन वाहतूक होत असल्याने अपघाताच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. नुकतेच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यामध्ये, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ आज दुपारच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. त्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना पिंपरी फाट्याजवळ कारचा अपघात झाला. मारुती स्विफ्ट कार चालकाचा वाहनावरील वरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली, त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या लेनवर जाऊन आदळल्यानं ही अपघाताची घटना घडली. कारचा स्पीड अधिक असल्याने अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं फोटोतून दिसून येत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातातील मृतदेह शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 

हेही वाचा

मंत्रिपदाची शपथ घेतली, पदभार स्वीकारला; संजय सावकारेंनी दालनात येताच अगोदर पूजा घातली

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
Nashik Crime : दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
दागिने दुप्पट करण्याचं आमिष, माजी महापौरांची 200 तोळे सोन्याची फसवणूक; सराफाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Nashik Crime News: एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला; नाशिकमधील 'त्या' घटनेमागचं धक्कादायक कारणही आलं समोर
एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला; नाशिकमधील 'त्या' घटनेमागचं धक्कादायक कारणही आलं समोर
Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश
अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Embed widget