Ramtek Bungalow : रामटेक बंगला, चर्चेचा इमला; काय सांगतो बंगल्याचा इतिहास Special Report
आता बातमी आहे एका बंगल्याची. या बंगल्याचं नाव रामटेक. मलबार हिलमध्ये समुद्रकिनारी असणारा हा अलिशान बंगला नवे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालाय. मात्र या बंगल्यात राहायला जावं की नाही, असा प्रश्न त्यांना पडल्याची माहिती आहे. आता हा प्रश्न पडण्यामागेही काही कारणं आहेत. पूर्वीच्या मंत्र्यांना आलेले अनुभव आणि शकुन-अपशकुन याबाबतचे समज यांच्या मिश्रणातून या बंगल्याची एक वेगळीच गोष्ट समोर येतेय. याचाच आढावा घेऊया, या सविस्तर रिपोर्टमधून.
हा आहे मलबार हिल परिसरात असणारा टुमदार रामटेक बंगला..
मंत्र्यांइतकाच सतत चर्चेत राहणारा आणि बातम्यांमध्ये झळकणारा बंगला..
देवगिरी बंगला आणि सागर बंगला यांच्या बरोबर मध्ये असणारा...
आणि विशेष म्हणजे या दोन्हीपासून 'समान अंतर' राखून असणारा बंगला..
मलबार हिल परिसरातला सी-फेसिंग असणारा हा बंगला कुणालाही हवाहवासा वाटेल असाच..
पण सध्या मात्र हा बंगला मंत्र्यांना नकोसा वाटू लागल्याची चर्चा आहे.