(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'झुंड'चा ट्रेलर लॉंच
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या बहुप्रतिक्षित 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये बिग बी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केले आहे. हा सिनेमा फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. 4 मार्च 2022 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा सध्या चर्चेत आहे. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. पण आता कोणत्याही बदलाविना 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा प्रदर्शित करण्यास संजय लीला भंसाळींना हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमामुळे महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ
महेश मांजरेकर यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महेश मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप महेश मांजरेकरांवर करण्यात आला होता. 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' या सिनेमात लहान मुलांच्या आक्षेपार्ह चित्रीकरणाप्रकरणी माहिम पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
शिबानी-फरहाननं शेअर केले लग्न सोहळ्यातील खास फोटो
बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. नुकतेच फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फरहाननं लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत लिहिले आहे, 'काही दिवसांपूर्वी मी आणि शिबानी लग्नबंधनात अडकलो आहोत.आम्ही त्या सर्वांचा आभार मानतो ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे काही फोटो आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.' तर शिबानीनं या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'Mr & Mrs'.
प्रसिद्ध आर जे रचनाचं निधन
प्रसिद्ध दाक्षिणात्य आर जे रचनाचे मंगळवारी (22 फेब्रुवारी) कार्डियक अरेस्टने निधन झाले आहे. वयाच्या 39 व्या वर्षी रचनानं अखेरचा श्वास घेतला. रचना ही बेंगळुरू येथील जे. पी नगरमध्ये राहत होती. रेडिओ मिर्ची या रेडिओ चॅनेलवरील विविध कार्यक्रमांमधून रचना ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती.
संबंधित बातम्या
Sukesh ChandraShekhar : सुकेश चंद्रशेखर प्रकरणात फक्त जॅकलिन आणि नोराच नाही तर 'या' अभिनेत्रींचाही समावेश
Gangubai Kathiawadi : गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
माझं काम होतं टायगरला जन्म देणं... त्याला स्टार तुला करावं लागेल; जाणून घ्या जॅकीदादा अन् साजिद नाडियावाला यांच्यातील तो भन्नाट किस्सा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha