एक्स्प्लोर
Big Clash At Box Office On May 1: 1 मे रोजी बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश'; बॉलीवूड, टॉलिवूड, कॉलिवूड अन् हॉलिवूड एकमेकांना भिडणार
Big Clash At Box Office On May 1: या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी अशा चित्रपटांची लिस्ट घेऊन आलो आहोत. जो 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यादीत कोणाकोणाची नावं आहेत, सविस्तर जाणून घेऊयात...
Big Clash At Box Office On May 1
1/9

जर तुम्ही सिनेप्रेमी असाल तर, त्यामुळे मे महिना तुमच्यासाठी खूप रोमांचक असणार आहे. खरं तर, या महिन्याच्या पहिल्या दिवशी, चार चित्रपट नाही तर चार इंडस्ट्री म्हणजेच टॉलीवूड, कॉलीवूड, बॉलिवूड आणि हॉलिवूड एकमेकांशी भिडणार आहेत. जाणून घेऊयात 1 मे रोजी कोणते चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. याबाबत सविसतर...
2/9

या यादीत पहिल्या क्रमांकावर कॉलिवुडचा सूर्या स्टारर 'रेट्रो' चित्रपट आहे. ज्याचं दिग्दर्शन सुब्बाराज यांनी केलं आहे. हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
3/9

याशिवाय, या इंडस्ट्रीतील शशिकुमार आणि सिमरन अभिनीत 'टूरिस्ट फॅमिली' देखील आहे. हा देखील 1 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
4/9

याशिवाय, मल्याळम चित्रपट उद्योगातील आसिफ अली अभिनीत 'अभिंतरा कुट्टावल्ली' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 111
5/9

जर आपण बॉलिवूडबद्दल बोललो, तर इथेही 1 मे रोजी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी पहिला चित्रपट म्हणजे अजय देवगणचा 'रेड 2'.
6/9

यावेळी अजय देवगण रितेश देशमुखशी टक्कर देणार आहे, चाहतेही चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.
7/9

'रेड 2' व्यतिरिक्त, संजय दत्तचा 'द भूतनी' हा चित्रपट देखील 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सनी सिंह आणि मौनी रॉय देखील असतील.
8/9

जर तुम्ही हॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल. तर तुमच्यासाठीही एक आनंदाची बातमी आहे. येथून, 'थंडरबोल्ट्स' 1 मे रोजी प्रदर्शित होईल. ज्याचं दिग्दर्शन जेक श्रेयर यांनी केलंय.
9/9

तेलुगू चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, सुपरस्टार नानी स्टारर 'HIT 3' हा चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Published at : 25 Apr 2025 07:35 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















