Sachin Kurmi : दादांच्या कार्यकर्त्याची भायखळ्यात हत्या, सचिन कुर्मींच्या हत्येमागचा आका कोण? दक्षिण मुंबईत पोस्टर्स
Sachin Kurmi : सचिन कुर्मी यांच्या हत्येमागचा आका कोण? असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स भायखळ्यामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत.

Sachin Kurmi : भायखळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची ऑक्टोबर 2024 मध्ये हत्या झाली होती. यामध्ये 16 आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, हत्येमागे असलेला मुख्य आरोपी अजूनही मोकाट असल्याचा खळबळजनक आरोप सचिन कुर्मी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जो पर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत 1 मे पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. तर सचिन कुर्मी यांच्या हत्येमागचा आका कोण? असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स भायखळ्यामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत.
सचिन कुर्मी यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणात 16 आरोपी असल्याचे समोर आले आहे. यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, या हत्येचा मुख्य आरोपी अजूनही पकडलेला नाही. या आरोपीला राजकीय नेत्यांचं आणि सरकारचं अभय आहे, त्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असा आरोप कुर्मी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सचिन कुर्मी यांच्या हत्येमागचा आका कोण?
जो पर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत 1 मे पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. राजकीय दबावापोटी सचिन कुर्मी यांच्या हत्येमागचा मुख्य आरोपी मोकाट आहे. हा आरोपी नेमका कोण आणि कोणत्या राजकीय पक्षाचा यामध्ये दबाव आहे? या सगळ्याची माहिती एक मे रोजी उपोषण सुरू करताना देणार असल्याचं कुटुंबियाने सांगितलं आहे. तर सचिन कुर्मी हत्येमागचा आका कोण? असे प्रश्न विचारणारे पोस्टर्स भायखळ्यामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत. या पोस्टर्सची आता भायखळ्यामध्ये चर्चा रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
भायखळा येथे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आणि छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय असलेले सचिन कुर्मी यांची 4 ऑक्टोबर 2024 रोजी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 16 आरोपी असून पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. 4 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री १२ वाजता सचिन कुर्मी हे भायखळा येथील म्हाडा कॉलनी येथे गेले होते. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात कुर्मी हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले तेव्हा कुर्मी ही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने त्यांच्या गाडीतून जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच कुर्मी यांचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
























