एक्स्प्लोर
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड बंदुकीच्या गोळीनं रक्ताळलं; त्याच ठिकाणी अनेकदा बॉलिवूड विसावलं
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack:जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय.
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack
1/13

यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय.
2/13

पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
3/13

पण, ज्या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या पहलगामवर दहशतवाद्यांनी निशाणा साधला, ते पहलगाम मिनी स्विट्झरलँड म्हणून ओळखलं जातं. इथे अनेक सिनेमांचं चित्रिकरणही करण्यात आलंय.
4/13

बेताब (Betab): सनी देओल आणि अमृता सिंह स्टारर सिनेमातही पहलगामचं सौंदर्य दाखवण्यात आलंय.
5/13

बॉबी (Boby): ऋषी कपूर आणि डिंम्पल कपाडिया स्टारर बॉबी सिनेमातही पहलगाम दिसलंय.
6/13

हायवे (Highway): आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा स्टारर हायवे चित्रपटाचा क्लायमॅक्स पहलगाममध्ये शूट करण्यात आला आहे.
7/13

ये जवानी है दिवानी (Yeh Jawaani Hai Deewani): रणबीर कपूर, दीपिका पादुकोण स्टारर 'ये जवानी है दीवानी' सिनेमातील काही सीन्समध्ये कश्मीरला मनाली म्हणून दाखवण्यात आलं आहे.
8/13

जब तक है जान (Jab Tak Hai Jaan): शाहरुख खान, कतरिना कैफ स्टारर 'जब तक है जान' सिनेमाचं शुटींगसुद्धा पहलगाममध्ये झालं आहे.
9/13

लैला-मजनू (Laila Majnu) : काही दिवसांपूर्वी आलेल्या 'लैला-मजनू' सिनेमातील काही सीन्स पहलगाममध्येच चित्रित करण्यात आले होते. सिनेमातील सीन्समधून पहलगामचं सौंदर्य पाहायला मिळतंय.
10/13

हैदर (Haider) : शाहीद कपूर स्टारर फिल्म 'हैदर'ची शुटिंग पहलगाममध्ये करण्यात आली होती.
11/13

राझी (Raazi): 'राझी' फिल्ममध्ये जेव्हा आलिया लग्नानंतर पाकिस्तानला जाते, तेव्हाचा सीन पहलगामच्या काही डोंगराळ भागात चित्रित करण्यात आलाय.
12/13

रॉकस्टार (Rockstar): रणबीर कपूर आणि नरगिस स्टारर 'रॉकस्टार'च्या काही सीन्सची शुटिंग कश्मीर आणि पहलगाममध्ये करण्यात आलेली.
13/13

बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan): सलमान खानची सुपरहिट मूव्ही 'बजरंगी भाईजान'ची शुटिंग पहलगाममध्ये करण्यात आली होती.
Published at : 23 Apr 2025 01:04 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























