OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार 'या' वेब सीरिज आणि सिनेमे
Upcoming Movies : या आठवड्यात ओटीटीवर अनेक सिनेमे आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.
OTT Release This Week : गेल्या आठवड्यात अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून या आठवड्यात देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. जाणून घ्या कोणते सिनेमे आणि वेब सीरिज या आठवड्यात रिलीज होणार आहेत.
मॉर्डन लव मुंबई : 'मॉर्डन लव मुंबई' या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा विशाल भारद्वाज, हंसल मेहता, शोनाली बोस, ध्रुव सेहगल, अलंकृता श्रीवास्तव आणि नूपुर अस्थाना या सहा दिग्दर्शकांनी सांभाळली आहे. ही वेब सीरिज 13 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
द कश्मीर फाइल्स : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता हा सिनेमा 13 मे रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
बीस्ट : विजयचा 'बीस्ट' सिनेमा 13 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. आता हा सिनेमा 13 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.
पुझू : रथीना पीटी दिग्दर्शित 'पुझू' हा सिनेमा प्रेक्षकांना तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेत 13 मे रोजी सोनी लिव्हवर पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या