एक्स्प्लोर
पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, थिएटर मालकांचा निर्णय
मुंबई : पाकिस्तान कलावंत असलेले कोणतेही चित्रपट दाखवणार नाही, असा निर्णय सिंगल स्क्रीन मालक असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या 'ए दिल है मुश्किल' तर नववर्षात प्रदर्शित होणाऱ्या 'रईस'च्या अडचणीत वाढ झाली आहे.
'ए दिल है मुश्किल' 28 ऑक्टोबर आणि 'रईस'26 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध केला. 'ए दिल है मुश्किल'मध्ये फवाद खान आणि 'रईस' सिनेमात माहिरा खान हे पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता.
आता इम्फापाठोपाठ सिंगल स्क्रीन थिएटर असोसिएशननेही पाकिस्तानी कलाकार असलेले कोणतेही चित्रपट दाखवणार नसल्याची भूमिका घेतल्याने 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'ची अडचण वाढली आहे.
तर सिनेमा ओनर्स एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकमधील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स मालकांनी पाकिस्तानी कलाकार असलेला सिनेमा न दाखवण्याचं ठरवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
बीड
क्राईम
Advertisement