Heropanti 2 Box Office Collection : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई
Heropanti 2 : 'हीरोपंती 2' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
Heropanti 2 Box Office Collection : 'अॅक्शन हिरो' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) चा 'हीरोपंती 2' (Heropanti 2) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे.
'हीरोपंती 2' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी आठ कोटींची कमाई केली आहे. विकेण्डला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टायगर श्रॉफच्या 'बागी 3' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 94 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे 'हीरोपंती 2' हा सिनेमा 'बागी 3' सिनेमाला मागे टाकेल असे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
'हिरोपंती 2' सिनेमात टायगर बबलू हे पात्र साकारत आहे. तर अमृता सिंहने त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या पात्राचे नाव लैला असे आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर अजय देवगनच्या ‘रनवे 34’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 3.50 कोटींची कमाई केली आहे.
संबंधित बातम्या