एक्स्प्लोर

Telly Masala : अल्फा चित्रपटाची रिलीज डेट समोर ते बॉर्डर 2 मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Singham Again Trailer : 'या' दिवशी रिलीज होणार 'सिंघम अगेन'चा ट्रेलर, त्या आधीच सोशल मीडियावर फेक VIDEO व्हायरल

Singham Again Movie Release Date : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिंघम अगेन चित्रपट यंदाच्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह स्टारर सिंघम अगेनचा ट्रेलर लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. बिग बजेट, तगडी स्टारकास्ट आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ॲक्शन पाहण्यासाठी प्रेक्षक फार आतुर झाले आहे. सिंघम अगेन चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Shweta Tiwari Birthday : 500 रुपये महिना पगार, आज एका प्रोजेक्टसाठी कमावते कोट्ववधी रुपये; वयाच्या चाळीशीतही तरुणाईला लाजवेल असं सौंदर्य

Shweta Tiwari Birthday Special : अभिनेत्री श्वेता तिवारी हे टेलिव्हिज इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीचा आज 4 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. श्वेता तिवारी भोजपुरी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता तिवारी लवकरच रोहिश शेट्टी दिग्दर्शित अजय देवगण, दीपिका पदुकोण स्टारर 'सिंघम अगेन' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. बॅकग्राऊंड आर्टीस्टपासून ते स्टारडम मिळवण्यापर्यंतचा श्वेताचा प्रवास खूप संघर्षमय आहे. तिच्या प्रोफशनल आयुष्यासोबतच तिचं पर्सनल लाईफ जास्त चर्चेत राहिलं आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आतापर्यंतच्या प्रवासवर एक नजर टाकूया.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Raj Thackeray : राज ठाकरे दारात पोहोचताच प्रसिद्ध गायिकेनं नजर काढून बोटं मोडली, औक्षण करत जोरदार स्वागत

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडे यांच्या म्युझिक ॲकाडमी लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली. राज ठाकरे यांच्या हस्ते म्युझिक ॲकाडमीचं उद्घाटन करण्यात आलं. यामुळे आता सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. आजपासून वैशाली माडेच्या म्युझिक ॲकाडमीची सुरूवात सुरू झाली आहे. या ॲकाडमीमध्ये संगीत शिकणाची इच्छा असणाऱ्यांना संगिताचं संपूर्ण शिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

शैतानचा 'विलन' आणि जवानची 'हिरोईन'; दोघांचा बहुचर्चित 'टेस्ट' थिएटरमध्ये नाहीतर, OTT वर येणार, कारण काय?

Upcoming Film TEST : बॉक्स ऑफिसवर (Box Office) ब्लॉकबस्टर ठरलेला शैतान (Shaitaan) चित्रपटाचा खलनायक आर. माधवन (R. Madhavan) आणि जवानची नायिका नयनतारा (Nayanthara) या दोघांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'टेस्ट' (Test) लवकरच प्रदर्शित होणार आहे. चाहते कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत. पण, जर तुम्ही मस्तपैकी मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहण्याचा प्लान करत असाल, तर तुम्हाला प्लानमध्ये थोडासा बदल करावा लागेल.  कारण आता हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न होता, थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Border 2 : बॉर्डर 2 मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलसोबत दिसणार अहान शेट्टी

Ahaan Shetty in Border 2 Movie : देशभक्तिपर चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर कायम क्रेझ पाहायला मिळते. 1997 मध्ये आलेला बॉर्डर चित्रपट प्रेक्षकांच्या आवडत्या देशभक्तिपर चित्रपटांपैकी एक आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. आता 27 वर्षानंतर बॉर्डर चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा झाली आहे. बॉर्डर 2 चित्रपटात अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याची वर्णी लागली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget