Shweta Tiwari Birthday : 500 रुपये महिना पगार, आज एका प्रोजेक्टसाठी कमावते कोट्ववधी रुपये; वयाच्या चाळीशीतही तरुणाईला लाजवेल असं सौंदर्य
Shweta Tiwari Journey & Career : अभिनेत्री श्वेता तिवारीचा 44 वा वाढदिवस आहे. एक बॅकग्राऊंड आर्टीस्टपासून ते प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या.
Shweta Tiwari Birthday Special : अभिनेत्री श्वेता तिवारी हे टेलिव्हिज इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीचा आज 4 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. श्वेता तिवारी भोजपुरी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. श्वेता तिवारी लवकरच रोहिश शेट्टी दिग्दर्शित अजय देवगण, दीपिका पदुकोण स्टारर 'सिंघम अगेन' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. बॅकग्राऊंड आर्टीस्टपासून ते स्टारडम मिळवण्यापर्यंतचा श्वेताचा प्रवास खूप संघर्षमय आहे. तिच्या प्रोफशनल आयुष्यासोबतच तिचं पर्सनल लाईफ जास्त चर्चेत राहिलं आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आतापर्यंतच्या प्रवासवर एक नजर टाकूया.
हॅप्पी बर्थडे श्वेता तिवारी
छोट्या पडद्यावरील 'कसौटी जिंदगी के' या टीव्ही मालिकेतून श्वेता तिवारी हे नाव घराघरात पोहोचलं. 'कसौटी जिंदगी के' मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून श्वेताने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. यासोबतच तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. श्वेता तिवारीला प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमध्येही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, यावरही ती जिद्दीने मात करत पुढे आली.
सुरुवातील 500 रुपये महिना पगार
श्वेता तिवारी इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कामाला होती, जिथे तिला 500 रुपये महिना पगार मिळत होता. इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला श्वेता तिवारीला बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम मिळालं होतं. त्यावेळी एकता कपूरची तिच्यावर नजर पडली आणि श्वेताचं नशीब फळफळलं. भोजपुरी इंडस्ट्री, नंतर टीव्ही आणि आता बॉलिवूड असा श्वेताचा प्रवास आहे. श्वेता तिवारीने टीव्ही मालिकांच नव्हे, तर भोजपुरी, पंजाबी आणि नेपाळी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
View this post on Instagram
'कसौटी जिंदगी के' मालिकेतून मिळाली ओळख
एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी के' या मालिकेमुळे श्वेता तिवारी टीव्ही इंडस्ट्रीमधील स्टार बनली. 2001 ला सुरु झालेली ही टीव्ही मालिका 2008 पर्यंत चालली, ज्यामध्ये श्वेता तिवारीने प्रेरणा शर्मा-बजाज ही व्यक्तिरेखा साकारुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. श्वेता तिवारी बिग बॉस 4 मध्ये सहभागी झाली होती. या सीझनमध्ये डॉली ब्रिंदासोबतची तिची भांडणं चर्चेचा विषय ठरली, पण त्यावेळीही श्वेताने संयम दाखवला. बिग बॉसमध्ये श्वेताने प्रामाणिकपणाच्या जोरावर प्रेक्षकांची दाद मिळवली आणि ट्रॉफीवर नाव कोरलं.
दोन वेळा संसार मोडला, दोन मुलांची जबाबदारी
श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं, पण या लग्नामुळे तिला खूप त्रास झाला. अखेर तिने 2007 मध्ये राजाला घटस्फोट दिला. यानंतर तिचं अभिनव कोहलीवर प्रेम जडलं, पण हे नातंही फार काळ टिकलं नाही. तिला अभिनवकडून घरगुती हिंसाचाराचाही सामना करावा लागला आणि त्यानंतर तिने पलक आणि रेयांश या दोन मुलांसह वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या 42 व्या वर्षीही श्वेता तिच्या फिटनेस आणि सौंदर्य तरुणाईला लाजवेल असं आहे. श्वेताने स्वत:च्या बळावर दोन्ही मुलांचा सांभाळ केला आहे. तिची मुलगी पलक तिवारीही इंडस्ट्रीमधील ओळखीचं नाव बनली आहे.