एक्स्प्लोर

Telly Masala : 'लिटिल चॅम्प'फेम कार्तिकी गायकवाड आई होणार ते 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांकडून अपडेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

'लिटिल चॅम्प'च्या घरी पाळणा हलणार; इवलुशा पावलांनी नवा पाहुणा घरी येणार, सोशल मीडियावर Video VIRAL

Kartiki Gaikwad Pregnancy News :  'सारेगमप लिटिल चॅम्प'मधील छोट्या गायकांची रिएल्टी शोनंतरही त्यांच्या आवाजाची जादू कायम आहे. आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी गायिका कार्तिकी गायकवाडचा (Kartiki Gaikwad) मोठा चाहता वर्ग आहे. कार्तिकी गायकवाड नेहमीच चर्चेत असते. आता लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने आणखी एक गुड न्यूज दिली आहे. कार्तिकी आई होणार असून नुकतेच डोहाळं जेवणाचा कार्यक्रम पार पडला. याचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट

Mirzapur 3 Release Date :  अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अली फजल (Ali Fazal) यांची प्रमुख भूमिका असलेली वेब सिरीज 'मिर्झापूर'ला (Mirzapur) प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मिर्झापूरच्या दोन्ही सीझननंतर आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी  मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची (Mirzapur 3) झलकही समोर आली होती. त्यानंतर आता ही सीरिज कधी रिलीज होणार  याकडे लक्ष लागले आहे. वेब सीरिजचा निर्माते रितेश सिधवानी यांनी आता रिलीजबाबत मोठी अपडेट दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Shubha Khote Husband Death : अनेक दशके मराठी-हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचे वृद्धपकाळाने निधन  झाले आहे. मागील काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. गुरुवारी, 28 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी

OTT Web Series Release : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Releases This Weekend) प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी असणार आहे. कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो असे वेब सीरिज, चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आपल्या टीमसह आता ओटीटीवर झळकणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

पाच वेळच्या खासदारांचा पराभव, वयाच्या चाळीशीत लोकसभेत अन् आता पुन्हा राजकारणात; असा राहिला गोविंदाचा राजकीय प्रवास

Govinda :   बॉलिवूडवर कधीकाळी अधिराज्य गाजवणारा 'हिरो नंबर 1'  असलेला अभिनेता गोविंदा (Govinda) याने पुन्हा एकदा राजकारणातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. जवळपास 14 वर्षानंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गोविंदाने प्रवेश केला आहे. गोविंदाच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही एखाद्या चित्रपटाला साजेशी ठरली. मात्र, त्याच्या खासदारकीचा टर्मचा क्लायमॅक्स हा 'खलनायकी' ठरला. लोकांना उपलब्ध न होणारा, मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलेला खासदार अशी गोविंदाची चर्चा होऊ लागली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget