Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
Mirzapur 3 Release Date : मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची झलकही समोर आली होती. त्यानंतर आता ही सीरिज कधी रिलीज होणार याकडे लक्ष लागले आहे. वेब सीरिजचा निर्माते रितेश सिधवानी यांनी आता रिलीजबाबत मोठी अपडेट दिली आहे.
Mirzapur 3 Release Date : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि अली फजल (Ali Fazal) यांची प्रमुख भूमिका असलेली वेब सिरीज 'मिर्झापूर'ला (Mirzapur) प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मिर्झापूरच्या दोन्ही सीझननंतर आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची (Mirzapur 3) झलकही समोर आली होती. त्यानंतर आता ही सीरिज कधी रिलीज होणार याकडे लक्ष लागले आहे. वेब सीरिजचा निर्माते रितेश सिधवानी यांनी आता रिलीजबाबत मोठी अपडेट दिली आहे.
6 वर्षांपूर्वी आला होता मिर्झापूरचा पहिला सीझन
मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता. क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्स कथानक असलेल्या वेब सीरिजला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रेक्षकांच्या मागणीनंतर या सीरिजचा दुसरी सीझनही 2020 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर आता तिसऱ्या सीझनची प्रतिक्षा चाहत्यांना लागली आहे.
निर्मात्यांनी मिर्झापूर वेब सीरिजचा तिसरा सीझन आणण्यासाठी तब्बल 4 वर्षांचा कालावधी घेतला आहे. आता 'मिर्झापूर 3' 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, तो कधी प्रदर्शित होणार याच्या तारखेवरून अनेक चर्च सुरू आहेत.
कधी रिलीज होणार 'मिर्झापूर -3' ?
'मिर्झापूर' वेब सीरिजचा निर्माता रितेश सिधवानी याने 'मिर्झापूर -3'च्या रिलीजबाबत मोठी अपडेट दिली आहे. एक न्यूज पोर्टलसोबत बोलताना त्याने म्हटले की, 'मिर्झापूर -3' ही वेब सीरिज जून-जुलै दरम्यान रिलीज होऊ शकते. रितेशच्या या वक्तव्यानंतर 'मिर्झापूर -3' ही वेब सीरिज वर्षाच्या मध्यात प्रेक्षकांच्या भेटीसाठी येऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
दरम्यान, 'मिर्झापूर -3'च्या रिलीज डेटबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. चाहतेदेखील या वेब सीरिजची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे. मात्र, काही कारणास्तव या सीरिजच्या रिलीजसाठी उशीर होत असल्याची माहिती आहे.
View this post on Instagram
'मिर्झापूर'मध्ये तगडी स्टारकास्ट
मिर्झापूर वेब सीरिजमध्ये कुलभूषण खरबंदा, पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, विक्रांत मेस्सी, दिवेंद्रू शर्मा, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, शीबा चड्ढा, हर्षिता गौर, श्रिया पिळगावकर आदी कलाकार झळकले होते. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेता विजय वर्माची आणि लिलीपुट यांची एन्ट्री झाली होती. त्यामुळे आता तिसऱ्या सीझनमध्ये कोणते नवीन कलाकार असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.