Telly Masala : अनुष्का शर्माच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार ते 'नवरा माझा नवसाचा 2' येतोय; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी; तरुणाच्या डोक्यात लागला दगड
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला की राडा, गोंधळ या गोष्टी आल्याच. नुकतचं उदगीर (Udgir) येथे गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Navra Mazha Navsacha 2 : अशोक सराफसह सचिन पिळगावकर पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज, लवकरच येणार 'या' सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग
Navra Mazha Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा' (Navra Mazha Navsacha) या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेरसिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 20 वर्षांपूर्वी गाजलेल्या सिनेमाचा अखेर मुहूर्त ठरला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Anushka Sharma Virat Kohli : अनुष्का शर्मा - विराट कोहली दुसऱ्यांदा आई-बाबा होणार! माजी खेळाडूने दिली गोड बातमी
Virat Kohli Anushka Sharma Second Child : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. अनुष्का सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) गोड बातमी सांगितली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Shahid Kapoor : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार शाहिद कपूर? भारतीय सिनेसृष्टीतील महागडा चित्रपट
Shahid Kapoor Play Chhatrapati Shivaji Maharaj : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'कबीरसिंह', 'पद्मावत', 'जर्सी' आणि 'हैदर'सारखे सुपरहिट सिनेमे देणारा अभिनेता आता ऐतिहासिक सिनेमा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Poonam Pandey : पूनम पांडेला अटक होणार? मरणाचं ढोंग पडणार महागात
Poonam Pandey : लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चांगलीच चर्चेत आहे. सर्वायकल कॅन्सरने (Cervical cancer) निधन झाल्याची खोटी बातमी (Fake News) पसरवल्यामुळे आता पूनम पांडेला (Poonam Pandey Death Fake News) अटक होऊ शकते, असे म्हटले जात आहे. मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याने महाराष्ट्राच्या MLA सदस्यांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.