Navra Mazha Navsacha 2 : अशोक सराफसह सचिन पिळगावकर पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज, लवकरच येणार 'या' सुपरहिट सिनेमाचा दुसरा भाग
Navra Mazha Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा' या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिळ पिळगावकर (Sachin Pilgaonkar) या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहेत.
Navra Mazha Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा' (Navra Mazha Navsacha) या बहुचर्चित सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेरसिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 20 वर्षांपूर्वी गाजलेल्या सिनेमाचा अखेर मुहूर्त ठरला आहे.
'नवरा माझा नवसाचा 2'च्या शूटिंगला सुरुवात
'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी या सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"नवरा माझा नवसाचा 2' शूटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहुद्या".
जयवंत वाडकर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव
जयवंत वाडकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाच्या पोस्टवर सगळी ओरिजनल स्टारकास्ट हवी, प्रदीप वटवर्धन यांची आठवण येईल, अशोक मामा असतील तर सिनेमा सुपरहिट होईल, आजही पहिला भाग उत्साहात पाहतो, खूप खूप शुभेच्छा, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
'नवरा माझा नवसाचा' सिनेमाबद्दल जाणून घ्या... (Navra Mazha Navsacha Movie Details)
'नवरा माझा नवसाचा' हा सिनेमा 2004 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या विनोदी सिनेमाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या सिनेमात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर (Sachin Pilgaonkar), अशोक सराफ (Ashok Saraf), सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'नवरा माझा नवसाचा 2' या सिनेमाची घोषणा झाल्यामुळे आता हा सिनेमा कधी रिलीज होणार? या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार? या सिनेमाचं कथानक काय असेल? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सचिन पिळगावकर या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.
'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
'नवरा माझा नवसाचा' या सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या सिनेमातील चला ना गडे, हिरवा निसर्ग हा भवतीने, चला जेजुरीला जाऊ, वेदशास्त्रामाजी हो मंगलमूर्ती या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
संबंधित बातम्या