एक्स्प्लोर

Telly Masala : 'Cannes 2024'मध्ये भारताने रचला इतिहास ते कंगना रणौतचा खळबळजनक दावा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Anasuya Sengupta : 'Cannes 2024'मध्ये भारताने रचला इतिहास; अनसूया सेनगुप्ता ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय!

Anasuya Sengupta Win Best Actress Award : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024' (Cannes Film Festival 2024) सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारतातील अनेक अभिनेत्री यंदाच्या 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये भारताच्या अनसूया सेनगुप्ताने (Anasuya Sengupta) इतिहास रचला आहे. कोलकातात राहणाऱ्या अनसूया सेनगुप्ताला 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पुरस्कार पटकावणारी ही पहिली भारतीय ठरली आहे. अनसूया सेनगुप्ताला 'शेमलेस' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. अनसूया सेनगुप्ताच्या या यशानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kangana Ranaut : कंगना रणौतचा खळबळजनक दावा, 'कोणतीही नवीन हिरोईन आली की तिला दाऊदसमोर...'

Kangana Ranaut :  आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. हिमाचल प्रदेशमधून कंगणा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. प्रचार सभांमध्ये कंगणा रणौत विरोधकांवर जोरदार टीका करत आहे. आता तिने 'एबीपी माझा'सोबत साधलेल्या संवादात तिने बॉलिवूडवरही भाष्य केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kota Factory Season 3 Release Date : 'कोटा फॅक्ट्री 3'ची रिलीज डेट समोर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

Kota Factory : जितेंद्र कुमारची (Jitendra Kumar) 'कोटा फॅक्ट्री' (Kota Factory) ही प्रचंड लोकप्रिय वेबसीरिज आहे. या सीरिजचे दोन सीझन सुपरहिट झाले आहेत. चाहते आता या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. या वेब सीरिजमध्ये कोटामध्ये आलेल्या आयआयटी-जेईई आणि एनईईटी या परिक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सीरिजचा पहिला सीझन 2019 मध्ये युट्यूबवर आला. त्यानंतर या सीरिजला मिळत असलेली लोकप्रियता लक्षात घेत नेटफ्लिक्सने या सीरिजचा दुसरा सीझन रिलीज केला. आता या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. जाणून घ्या कोटा फॅक्ट्रीचा तिसरा सीझन कधी आणि कुठे पाहता येईल?

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Rajinikanth Sridevi Affair : वीज गेली अन् अपूर्ण राहिले रजनीकांतचे प्रेम, श्रीदेवीला करणार होते प्रपोज

Rajinikanth Sridevi :  सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे आपल्या चित्रपटांमुळे आणि आपल्या फॅन फॉलोईंगमुळे कायम चर्चेत असतात. रजनीकांत यांच्या अॅक्शन स्टाईलचे अनेकजण चाहते आहेत. रुपेरी पडदा गाजवणारे रजनीकांत यांच्या लव्ह स्टोरीबाबत फारशी चर्चा नाही. सरळमार्गी असणाऱ्या रजनीकांत यांचा जीव अभिनेत्री श्रीदेवीवर (Rajinikanth) जडला होता.  मात्र, अचानकपणे गेलेल्या वीजेमुळे त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Neena Gupta : "पैशांसाठी बी-ग्रेड भूमिका केल्या"; अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मांडली व्यथा

Neena Gupta : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या 'पंचायत 3' (Panchayat 3) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत. प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज करण्यात येणार आहे. याआधी या सीरिजचे दोन्ही सीझन हिट झालेले आहेत. आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. सीरिजमधील मंजू देवींची भूमिका चांगलीच गाजली. नीना गुप्ता यांनी ही भूमिका साकारली आहे.  अभिनेत्रीने आता आपल्या करिअरवर भाष्य केलं आहे. नीना गुप्ता यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. अभिनेत्रीने आता आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा देत व्यथा मांडली आहे. एकेकाळी अभिनेत्रीवर 'विद्रोही स्टार' आणि 'बोल्ड अभिनेत्री' असे टॅग लावले गेले होते.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget