एक्स्प्लोर

Rajinikanth Sridevi Affair : वीज गेली अन् अपूर्ण राहिले रजनीकांतचे प्रेम, श्रीदेवीला करणार होते प्रपोज

Rajinikanth Sridevi : सरळमार्गी असणाऱ्या रजनीकांत यांचा जीव अभिनेत्री श्रीदेवीवर (Rajinikanth) जडला होता.  मात्र, अचानकपणे गेलेल्या वीजेमुळे त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. 

Rajinikanth Sridevi :  सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे आपल्या चित्रपटांमुळे आणि आपल्या फॅन फॉलोईंगमुळे कायम चर्चेत असतात. रजनीकांत यांच्या अॅक्शन स्टाईलचे अनेकजण चाहते आहेत. रुपेरी पडदा गाजवणारे रजनीकांत यांच्या लव्ह स्टोरीबाबत फारशी चर्चा नाही. सरळमार्गी असणाऱ्या रजनीकांत यांचा जीव अभिनेत्री श्रीदेवीवर (Rajinikanth) जडला होता.  मात्र, अचानकपणे गेलेल्या वीजेमुळे त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. 

रजनीकांत यांचा जीव जडला... 

रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्यात घट्ट मैत्री राहिली आहे. रजनीकांत यांचा खासगी फोन क्रमांक हा फार कमी लोकांकडे असायचा. यामध्ये श्रीदेवी, के. बालचंद्र आणि कमल हासन यांचा समावेश होता. ऑन स्क्रीन  रजनीकांत यांची जोडी अनेक अभिनेत्रींसोबत झळकली असली तरी श्रीदेवीसोबत त्यांची केमिस्ट्री उत्तम जुळून आली. या दोघांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सुमारे 19 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. एकीकडे दोघेही एकत्र चित्रपट करत होते तर दुसरीकडे रजनीकांत हे श्रीदेवीच्या प्रेमात नकळतपणे पडत गेले. एका अंधश्रद्धेमुळे रजनीकांत यांचे प्रेम अपूर्ण राहिले. 

पहिल्यांदाच चित्रपटात झळकले... 

'मुंदरू मुदिचू' या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा काम केले. या चित्रपटात श्रीदेवीने रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. त्यावेळी रजनीकांत यांचे वय 25 वर्ष होते. तर, सावत्र आईची भूमिका साकारणाऱ्या श्रीदेवीचे वय अवघे 13 वर्ष होते. 

रजनीकांत-श्रीदेवीत चांगली मैत्री...

रजनीकांत आणि  श्रीदेवी यांच्यात चांगली मैत्री होती. या मैत्रीत रजनीकांत हे  श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. रजनीकांत आणि श्रीदेवीची आई यांच्या चांगले संबंध होते. रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्या वयात जवळपास 13 वर्षांचे अंतर होते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात रजनीकांत हे श्रीदेवीबद्दल काहीसे प्रोटेक्टिव्ह होते. त्यानंतर त्यांचा श्रीदेवीवर जीव जडला. एका वृत्तानुसार रजनीकांत यांनी श्रीदेवीच्या आईकडे तिच्या लग्नाबाबत विचारणा केली होती. 

रजनीकांत यांचा श्रीदेवीवर जीव जडला होता. मात्र, श्रीदेवीच्या मनात काय होते, हे मात्र कधीही समोर आले नाही. 

लग्नाचा प्रस्ताव बारगळला...

एका जुन्या मुलाखतीत,  के. बालचंदर यांनी सांगितले होते की श्रीदेवीवर रजनीकांत यांचे श्रीदेवीवर खूपच प्रेम होते. आपण  स्वत: लग्नाचा प्रस्ताव घेऊन श्रीदेवीच्या घरी जावे असा निर्णय रजनीकांत यांनी घेतला होता. एकदा गृहप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी रजनीकांत आणि के.बालचंदर हे श्रीदेवीच्या घरी पोहचले होते. त्यावेळी अचानक घरातील वीज गेली. हा अपशकुन असल्याचे रजनीकांत यांना वाटले. त्यामुळे निराश झालेल्या रजनीकांत यांनी लग्नाचा कोणताही विषय काढला नाही. रजनीकांत यांनी श्रीदेवीसोबत लग्नाचा विचार सोडून दिला. मात्र, दोघांमध्ये चांगली मैत्री कायम राहिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : सांगलीतल्या सभेत अमित शाहांचं सूचक वक्तव्य, 2 दिवसांत शाहांना सूर का बदलावे लागले?Shivani Vijay Wadettiwar  : वीज गेल्यामुळे काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवारांची भर सभेत शिवीगाळSudhakar Kohale Nagpur :  काँग्रेसच्या आरोपाला भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचं प्रत्युत्तरTuljapur Rana Jagjit Singh :'ठाकरेंनी तुळजाभवानी मंदिर विकासासाठी एक रुपयाही दिला नाही'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
Embed widget