एक्स्प्लोर

Telly Masala : अशोक सराफ, रोहिणी हटंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव ते अजयचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Ajay Devgn First Look Singham Again Movie : काश्मीरमधील नव्या मिशनवर बाजीराव सिंघम; अजय देवगणचा सिंघम अगेनमधील फर्स्ट लूक आउट

Ajay Devgn First Look Singham Again : अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या कॉप युनिव्हर्स सीरिजमधील चित्रपटाबद्दल चाहत्यांना अपडेट देत असतो.आता, 'सिंघम अगेन'मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अजय देवगण हा त्याच्या जुन्या बाजीराव सिंघमच्या लूकमध्ये  दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

Ashok Saraf Rohini Hattangadi : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 जून 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्यरसिकांमध्ये या सोहळ्याची चांगलीच उत्सुकता आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shah Rukh Khan : शाहरुख खानची तब्येत बिघडल्याने मलायका अरोरा हैराण; उष्माघातापासून बचाव करण्यासाठी चाहत्यांना दिल्या खास टिप्स

Malaika Arora on Shah Rukh Khan Heatstroke : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. अहमदाबादमध्ये उष्माघाताचा त्रास झाल्याने आयपीएल मॅचनंतर (IPL 2024) शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लाडक्या किंग खानला (King Khan) रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले होते. पण शाहरुखच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून तो मुंबईत आला आहे. अशातच मलायका अरोरा एका कार्यक्रमात पोहोचली. त्यावेळी तिने पर्यावरणाबद्दल भाष्य केलं. दरम्यान मलायकाने उष्माघातापासून कसा बचाव करायचा याच्या टिप्स दिल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Bhaiyya Ji Review : मनोज वाजपेयीच्या अभिनयासाठी पाहावा 'भैया जी'; वाचा रिव्ह्यू

Bhaiyya Ji Review : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee) आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्याच्या अभिनयाची रेंज खूपच जबरदस्त आहे. मनोजचे 2023 मध्ये 'गुलमोहर', 'एक बंदा काफी है' आणि 'जोरम' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यांसारख्या असंख्य चित्रपटांच्या माध्यमातून त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. मनोजचा 'भैया जी' (Bhaiyya Ji) हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भैया जी' हा मनोजचा 100 वा चित्रपट आहे. त्याने चित्रपटाची निर्मितीही केली आहे. त्याची पत्नीच चित्रपटाची निर्माती आहे. चित्रपटात मनोजचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पण कथानकात मात्र नाविन्य नाही. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Deepika Padukone : प्रेग्नेंसी आणि बेबी बम्पवर नेटकऱ्यांकडून घाणेरड्या कमेंट्स; दीपिकाने शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली...

Deepika Padukone :   मॉम-टू-बी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे बॉलिवूडमधलं जोडपं लवकरच आई-बाबा होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. दीपिकाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतर 'दीपवीर'च्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र, मागील दिवसांपासून दीपिकाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मुंबईत मतदानाच्या दिवशी दीपिका आणि रणवीर सिंह एकत्र दिसले. त्यावेळी दीपिकाचा बेबी बम्प दिसून आला. दीपिकाचे फोटो, व्हिडीओ पाहून काहींनी ट्रोल करणाऱ्या कमेंट्स केल्या. एका बाजूला ट्रोलिंग होत असताना दुसरीकडे दीपिकाने इन्स्टाग्रामवर आपली पहिली पोस्ट शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget