एक्स्प्लोर
तनुश्रीची नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांवर 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही तनुश्री दत्ताने केलीय. मुंबई पोलिस चौकशी करुन पुढील कारवाई करणार आहेत.
मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर आणि नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. मुंबईतील ओशिवारा पोलिस ठाण्यात तनुश्रीने तक्रार दाखल केलीय.
नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांवर 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही तनुश्री दत्ताने केलीय. मुंबई पोलिस चौकशी करुन पुढील कारवाई करणार आहेत.
जे खोटं आहे, ते खोटंच आहे' तनुश्रीच्या आरोपांवर नानांचं उत्तर "जे खोटं आहे ते खोटंच आहे" असं सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. 'हाऊसफुल 4' सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करुन नाना जैसलमेरहून मुंबईला परतले. त्यावेळी विमानतळावर परल्यानंतर मीडियाला नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर पत्रकार परिषद घेण्याच्या प्रश्नावर नाना एवढंच म्हणाले की, "लवकरच घेणार." दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यानतंर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं. तनुश्री दत्ताचा आरोप अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे." 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. संबंधित बातम्या तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखलMumbai: A complaint has been filed by Tanushree Dutta at Oshiwara police station in connection with 2008 movie set incident. Names of Nana Patekar and Ganesh Acharya mentioned in the complaint. #Maharashtra pic.twitter.com/qsNCfjrZp0
— ANI (@ANI) October 6, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement