Saleel Kulkarni : 'अन् अचानक समोर गोकुळधाम दिसलं'; सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. सध्या या मालिकेसंदर्भातली सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल होत आहे.

Saleel Kulkarni On Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी ही मालिका आवडीने पाहतात. गेल्या काही वर्षांत ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. अशातच या मालिकेसंदर्भातली सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल होत आहे.
सलील कुलकर्णींनी लाडक्या लेकासह 'ताकर मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या सेटला भेट दिली आहे. तसेच मालिकेसंदर्भातलं त्यांचं मत मांडलं आहे. सलील कुलकर्णींनी लिहिलं आहे,"मुलांच्या लहानपणीचे आणि माझ्या बाबापणाचे अनेक क्षण सुंदर करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'.
सलील कुलकर्णींनी पुढे लिहिलं आहे,"एका सिनेमाच्या शूटिंगसाठी फिल्मसिटीमध्ये शुभंकर आणि मी गेलो होतो आणि अचानक समोर 'गोकुळधाम' दिसलं. त्यानंतर मंदार चांदवडकर म्हणजेच मालिकेतील भिडेने अतिशय प्रेमाने आमची सेटवर जायची सोय केली आणि आपल्या लाडक्या जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीची भेट झाली. पुन्हा एकदा मुलं लहान झाली आणि त्या मालिकेने दिलेल्या सुंदर क्षणांचे मी मनापासून आभार मानले."
View this post on Instagram
सलील कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर त्यांची मतं स्पष्टपणे मांडत असतात. सलील कुलकर्णींची 'जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही', 'दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई', 'तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं', 'सासुरला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये' अशी अनेक गाणी ऐकायला चाहत्यांना आवडतात.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा 28 जुलै 2008 रोजी पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. आजही ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते आहे.
संबंधित बातम्या
























