Saleel Kulkarni : लिप सिंकवर सलील कुलकर्णींची नाराजी; म्हणाले,"Live Concert दरम्यान lip Synch करणं म्हणजे..."
Saleel Kulkarni : लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान होणाऱ्या लिप सिंकवर अखेर सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Saleel Kulkarni on Live Concert : डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) हे मराठीतील नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक आहेत. गेल्या काही दिवसांत संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लाइव्ह कॉन्सर्टदेखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अनेकदा रेकॉर्ड गाणी लावली जातात. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान होणाऱ्या लिप सिंकवर अखेर सलील कुलकर्णीने नाराजी व्यक्त केली आहे.
लाइव्ह कॉन्सर्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. खास लाइव्ह कॉन्सर्टसाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पण लाइव्ह कॉन्सर्ट असूनही गायक गाणं गात नाही. अनेकदा रेकॉर्ड गाणी लावली असतात. लाइव्ह कॉन्सर्टच्या नावाखाली प्रेक्षकांची फसवणूक होत असते. अखेर सलील कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सलील कुलकर्णी यांनी लिहिलं आहे,"लाइव्ह कॉन्सर्ट जाहीर करून रेकॉर्ड लावून लिप सिंक करणे म्हणजे जॉगिंगसाठी निघून कॅब करण्यासारखं आहे. सगळ्यांचीच फसवणूक". तसेच त्यांनी 'निरीक्षणे' हा हॅशटॅगदेखील वापरला आहे. सलील कुलकर्णींची ही पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारी आहे.
सलील कुलकर्णींच्या पोस्टवर 'हिंदीमध्ये असे प्रकार सर्रास होतात',कटू सत्य, आम्ही तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहोत, अशी ही फसवाफसवी, म्हणूनच आम्हाला सलील-संदीप सारख्या खणखणीत नाण्याचं कौतुक आहे अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सलील कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच त्यांची मतं स्पष्टपणे मांडत असतात. लाइव्ह कॉन्सर्टचा मोठा चाहतावर्ग असतो. सलील कुलकर्णींनी आजवर अनेक गाण्यांचे कार्यक्रम केले आहेत. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत काहीशे प्रयोग पार पडले आहेत.
सलील कुलकर्णींच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये 'जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही', 'दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई', 'तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं', 'सासुरला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये' अशी अनेक गाणी ऐकायला चाहत्यांना आवडतात.
संबंधित बातम्या