Swatantra Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटसाठी अंकिता लोखंडे एकही रुपया घेतला नाही; अभिनेत्रीने सांगितलं मोफत काम करण्याचं कारण
Swatantra Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटसाठी अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) काहीही मानधन घेतलं नाही. अभिनेत्रीने आता एकही रुपया न घेतल्याचं कारण सांगितलं आहे.
Swatantra Veer Savarkar : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) मुख्य भूमिकेत आहेत. आता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अंकिता लोखंडेने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी एकही रुपया घेतलेला नाही. 'बिग बॉस 17' फेम (Bigg Boss 17) अभिनेत्रीने नुकतच एका मुलाखतीत माझ्यासाठी पैशांपेक्षा प्रोजेक्ट महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. रणदीप हुड्डासह अंकिता लोखंडेच्या कामाचंही प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाची निर्मिती संदीप सिंह यांनी केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत संदीप सिंह म्हणाले की,"सावरकर' सिनेमा करण्यासाठी अनेकांना मी विचारत होतो. पण काही ना काही कारणाने कलाकार हा सिनेमा करणं टाळत होते. पण अंकिता लोखंडे माझी चांगली मैत्रीण असल्याने मी तिला या सिनेमासाठी विचारणा केली. त्यावेळी मी तिला कोणी माझ्यासोबत काम करण्यास इच्छूक नाही, असं सांगितलं नव्हतं. तर या सिनेमासाठी यमुनाबाईंची भूमिका तू साकारावी, असं मी तिला विचारलं होतं".
अंकिता लोखंडेने काहीही मानधन घेतलं नाही
संदीप सिंह पुढे म्हणाले की,"स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट करायला मी तयार आहे. पण माझी एक अट आहे. त्यावेळी मी तिला सांगितलं की, या भूमिकेबद्दल आता मी काहीही सांगू शकत नाही. ही भूमिका तुला करायची आहे. त्यावेळी अंकिता म्हणाली,"स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी मी काहीही मानधन घेणार नाही. तुझ्यासाठी मी एकही रुपया घेणार नाही". त्यावेळी हसत मी तिला म्हणालो होतो की,"सिनेमातील सर्व भूमिका तुच कर मग".
अंकिता लोखंडेने सांगितलं मानधन न घेण्याचं कारण
अंकिता लोखंडे पुढे म्हणाली की,"संदीप माझा चांगला मित्र असल्याने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासाठी मी त्याच्याकडून काहीही मानधन घेतलं नव्हतं. संदीप एका चांगल्या चित्रपटाची निर्मिती करेल, असा माझा त्याच्यावर विश्वास होता. मला फक्त या सिनेमाचा भाग व्हायचं होतं". 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाआधी अंकिता लोखंडेने 'मणिकर्णिका' या ऐतिहासिक सिनेमात काम केलं आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या (Swatantra Veer Savarkar Box Office Collection Day 5)
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 2.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.7 कोटी, चौथ्या दिवशी 2.15 कोटी आणि पाचव्या दिवशी 0.86 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या पाच दिवसांत सिनेमाने 9.0 कोटींचा गल्ला जमवला आहे.
संबंधित बातम्या