रिया चक्रवर्तीला सोडा.. एम्सच्या रिपोर्टनंतर स्वरा भास्करची मागणी
एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतसिंहने आत्महत्याच केल्याचा निष्कर्ष काढला आहे.त्यामुळे आता रिया चक्रवर्तीला तुरुंगातून सोडावं, अशी मागणी स्वराने केली आहे.
जवळपास तीन महिने ज्या गोष्टीची चर्चा देशभरात चालू होती त्या सुशांतसिंह मृत्यूबद्दलचा एम्सचा अहवाल आला. या अहवालात एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतसिंहने आत्महत्याच केल्याचा निष्कर्ष काढला आहे. या निर्णयामुळे अनेकांना चकित केलं आहे तर अनेकांना दिलासा दिला आहे. या निर्णयाचं स्वागत अभिनेत्री स्वरा भास्करने केलं आहे. एम्सचा हवाला देतानाच हा अहवाल आला असेल तर सुशांतच्या मृत्यूनंतर अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीला आता तुरुंगातून सोडावं अशी मागणी तिने केली आहे.
एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सगळ्यात आधी रिया चक्रवर्तीला सोडण्याची मागणी केली होती. ट्विटरवरून त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली. शिवाय, रियाला सोडण्याबद्दलचा हॅशटॅगही तयार केला. त्याच्या ट्विटला प्रतिसाद देताना स्वरा भास्करनेही चौधरी यांच्या मताला दुजोरा दिला आहे. स्वरा म्हणते, 'सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या न मानता हत्या असल्याचा संशय व्यक्त झाला. त्यानंतर तक्रार दाखल झाली आणि मग रिया चक्रवर्तीला त्या आरोपाखाली अटक केली गेली. यातून अनेक मुद्दे आले. परंतु, एम्सच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्याच केल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे तुरुंगात जो रियाचा छळ चालला आहे तो त्वरित थांबवावा आणि तिची सुटका करावी.' हे लिहितानाच स्वराने त्यावर हॅशटॅगचा वापर केला आहे.
संजूबाबाची प्रकृती खालावली; कर्करोगाच्या उपचारादरम्यानचा फोटो व्हायरल
सुशांतसिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. तसा प्राथमिक अंदाजही वर्तवण्यात आला होता. परंतु, ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय राजपूत कुटुंबियांना होता. त्यातून त्यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार केली. आर्थिक फसवणुकीची ही तक्रार होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेलं. एकिकडे सीबीआय चौकशी करत असतानाच एम्सच्या डॉक्टरांचं पथक वैद्यकिय तपासणी करण्यासाठी मुबंईत दाखल झालं. त्यात पोस्टमार्टम अहवालासह व्हिसेरा रिपोर्टपर्यंत अनेक गोष्टींची चाचपणी एम्सने सुरू केली. बारीक तपास केल्यानंतर सुशांतने आत्महत्या केल्याचा निर्वाळा एम्सने दिला आहे. त्यानंतर रियाला सोडण्याची मोहीम आता तीव्र होताना दिसते आहे.
सध्या रियाची चौकशी एनसीबी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करत असून त्यासाठी ती मुंबईतल्या भायखळ्याच्या तुरुंगात आहे. एम्सचा हा अहवाल आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. यात सुशांतच्या चाहत्यांचा समावेश होतो. शिवाय, सुशांतचा मृत्यू ही हत्याच आहे असं सांगणाऱ्या काही कलाकारांचाही यात समावेश होतो. शेखर सुमन, कंगना रनौत यांचा यात समावेश होतो. शेखर सुमनने तर बिहारमध्ये जाऊन राजपूत कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुशांतची हत्याच झाली असून त्याला फसण्यात आलं आहे असंही सुमन यांनी सांगितलं होतं. एम्सच्या अहवालानंतर सुमन यांनी बोलताना सांगितलं, एम्सचा अहवाल आला ते मला कळलं आहे. पण अद्याप हा लढा संपलेला नाही. इतर अनेक मुद्दे बाहेर येणं बाकी आहे तेही येतील.'
Param Bir Singh PC | SSR Suicide Case | मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न : परमबीर सिंग