Swanandi Berde Exclusive : लक्ष्याच्या लेकीची सिनेमात एन्ट्री! स्वानंदी बेर्डे म्हणाली,"वडिलांच्या नावामुळे एखादा सिनेमा मिळतो, पण.."
Swanandi Berde : लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदी बेर्डे 'मन येड्यागत झालं' (Man Yedyagat Zala) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Swanandi Berde : बॉलिवूडप्रमाणे आता मराठी मनोरंजनसृष्टीतही स्टारकिडचे वारे वाहू लागले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची कन्या स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज आहे. 'मन येड्यागत झालं' (Man Yedyagat Zala) या सिनेमाच्या माध्यमातून ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. स्टारकिड म्हणून आयुष्य जगताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, असं स्वानंदी म्हणाली.
'मन येड्यागत झालं'ची स्वानंदीला उत्सुकता
'मन येड्यागत झालं' या आपल्या सिनेमाबद्दल बोलताना स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde on Man Yedyagat Zala) म्हणाली,"मन येड्यागत झालं' या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाले आहे याची उत्सुकता आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. अखेर आता हा सिनेमा रिलीज होतोय याचा आनंद आहे. लवकरच मी आणखी कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल".
स्वानंदी म्हणते,"अभिनयक्षेत्रात पदार्पण करायचं असं माझं कधीच स्वप्न नव्हतं. पण माझ्यातली अभिनेत्री माझ्या आईला (Priya Berde) कुठेतरी दिसली. आईने आत्मविश्वास दिल्यामुळे मी अभिनय करायचं ठरवलं. पुढे मला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. आता याच क्षेत्रात करिअर करायचं मी ठरवलं आहे.
View this post on Instagram
स्वानंदी पुढे म्हणते,"धनंजय माने इथंच राहतात' ते 'मन येड्यागत झालं' हा प्रवास खूप काही शिकवणारा होता. रंगभूमीने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. नाटकावर माझं खूप प्रेम आहे. लाईव्ह सादरीकरण करायला मला आवडतं".
स्टारकिड असण्याबद्दल स्वानंदी म्हणाली," स्टारकिड असल्यामुळे सगळ्या गोष्टी सोप्या आहेत असं लोकांना वाटतं. पण खरं तर असं अजिबातच नाही. आम्हाला स्टारकिड आणि कलाकार अशा दोन्हीमध्ये स्वत:ला सिद्ध करावं लागतं. वडिलांच्या नावामुळे एखादा सिनेमा मिळतो. पण नंतर वारंवार स्वत:ला सिद्ध करत राहवं लागतं. स्टारकिड असल्यामुळे नक्कीच दडपण आहे. माझा सिनेमा किंवा नाटक पाहायला आज बाबा (Swanandi Berde on Laxmikant Berde) हवे होते असं नेहमीच वाटतं. रंगभूमीवर काम करत असताना आज बाबा असते तर एक वेगळं मार्गदर्शन मिळालं असतं असं वाटतं".
सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर स्वानंदीच्या जोडीला या चित्रपटात संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्ण यांचे रुप साकारत दर्शन देणारा अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता स्वानंदी व सुमेध यांची फ्रेश जोडी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे.
संबंधित बातम्या