NACDAC IPO : 10 कोटींच्या आयपीओवर पैशांचा पाऊस, 14386 कोटी रुपयांची बोली, SME IPO तब्बल 1976 पट सबस्क्राइब
NACDAC IPO : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील NACDAC कंपनीच्या एसएमई आयपीओला 1976 पट सबस्क्राइब करण्यात आलं आहे. एवढी बोली लागणारा हा पहिला आयपीओ ठरला आहे.
मुंबई : भारतीय शेअर बाजारात एकीकडे घसरणीचं चित्र पाहायला मिळत असताना आयपीओसाठी बोली लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शेअर बाजारात लिस्ट झालेल्या अलीकडच्या काळातील आयपीओंनी गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला आहे. सध्या एसएमई आयपीओ म्हणून लिस्ट होणाऱ्या एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर या गाझियाबादच्या कंपनीची जोरदार चर्चा आहे. कारण, या कंपनीनं एसएमई आयपीओ 10 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला होता. या आयपीओसाठी तब्बल 14386 कोटी रुपयांची बोली लागली आहे.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चरच्या गाझियाबाद येथील कंपनीचा आयपीओ तब्बल 1976 पट सबस्क्राइब झाला आहे.प्राथमिक माहितीनुसार भारताच्या भांडवली बाजारातील सर्वाधिक सबस्क्राइब होणारा हा इतिहासातील पहिला आयपीओ ठरला आहे. 2.7 कोटी अँकर इन्वेस्टरची गुंतवणूक वगळून ही रक्कम आहे.
बीएसईवरील डेटानुसार गैर संस्थात्मक गुंतवणूकदारा म्हणजे उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांनी या आयपीओला 2635 पट सबस्क्राइब केलं आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी 2504 पट सबस्क्राइब केलं आहे. तर, संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच म्युच्यूअल फंड्स, विमा कंपनी, विदेशी फंड या सारख्या संस्थांनी 236 पट आयपीओ सबस्क्राइब केला.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चरकडून 7.8 लाख शेअरची विकी दोन मुच्यूअल फंडला करण्यात आली आहे. एआय महा इन्वेस्टमेंट फंडनं 4.9 लाख शेअर खरेदी केले आहेत. तर, विकासा इंडिया इआयएफ आय फंडनं या अमेरिकेतील फंडनं 2.9 लाख फंड खरेदी केले.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची स्थापना 2012 मध्ये झाली होती.कंपनीनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3.2 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता.
एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 17 डिसेंबरला सुरु झाला होता. तर, आयपीओ सबस्क्राइब करण्याची मुदत 19 डिसेंबर 2024 होती. एनएसीडीएसी इन्फ्रास्ट्रकचरच्या एका लॉटसाठी 1 लाख 32 हजार रुपये लागणार होते. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 4 हजार शेअर होते. या कंपनीचा किंमतपट्टा 33-35 रुपये निश्चित करण्यात आला होता. या कंपनीचा आयपीओ 24 डिसेंबरला शेअर बाजारात लिस्ट होईल.
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स,टॉस द कॉइन, यश हायव्होल्टेज या सारख्या एसएमई आयपीओनं गुंतवणूकदारांना लिस्टींगला 90 टक्के परतावा दिला. तर, मेन बोर्ड आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना वन मोबिक्विक सिस्टीम्स, विशाल मेगा मार्टनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
इतर बातम्या :
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)