10 Years of Kai Po Che: 'काय पो छे' ची दहा वर्षे; सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीनं शेअर केली भावनिक पोस्ट
Sushant Singh Rajput: 'काय पो छे' (Kai Po Che) हा चित्रपट रिलीज होऊन दहा वर्षे झाली आहेत. त्यानिमित्तानं सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
10 Years of Kai Po Che: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput), राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अमित साध (Amit Sadh) यांचा 'काय पो छे' हा चित्रपट रिलीज होऊन दहा वर्षे झाली आहेत. 2013 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. ईशान, ओंमकार आणि गोविंद या तीन मित्रांची गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. नुकतीच या चित्रपटाबद्दल सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
श्वेता सिंह कीर्तीची पोस्ट
श्वेता सिंह कीर्तीनं पोस्टमध्ये चित्रपटगृहातील फोटो शेअर केला. या फोटोमध्ये प्रेक्षक हातात पॉपकॉर्न घेऊन थांबलेले दिसत आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'काय पो छे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रांग केली होती. भाईला मोठ्या पडद्यावर पाहून मला जास्त आनंद झाला. त्याला रुपेरी पडद्यावर मरताना पाहून मला खूप त्रास झाला. मी प्रचंड रडू लागले. चित्रपट बघून आल्यानंतर मी माझ्या भावाकडे तक्रार केली होती की, चित्रपटात हा सीन असल्याची माहिती त्यानी मला का दिली नाही? मी तो सीन पाहणं टाळलं असतं. 10 वर्षे झाली आणि सर्वकाही बदलले आहे. मी या आशेने पुढे जात आहे की या गोष्टी देखील बदलतील!'
View this post on Instagram
'काय पो छे' या चित्रपटाचं कथानक लेखक चेतन भगतच्या '3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. हा चित्रपट रिलीज होऊन 10 वर्ष झाल्यानंतर अभिनेता अमित साध यानं देखील एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं सुशांतसोबतचे काही फोटो शेअर केले. 'काय पो छे' या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Selfiee Review : सेलिब्रिटींसोबत 'सेल्फी' काढण्याचा अट्टाहास; चाहत्याची गोष्ट मांडणारा चित्रपट