एक्स्प्लोर
दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश
अभिनेत्री सनी लिओनीनं दिवाळीनिमित्त आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीनं दिवाळीनिमित्त आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर सनीनं एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओतून तिनं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण फटाके न वाजवण्याचं आवाहनही केलं आहे. यावेळी बोलताना सनी म्हणाली की, 'फटाक्यांमुळे लहान मुलं आणि जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.' यासाठीच तिने दिवाळी फटाके न वाजवण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, सनी लिओनीचा आगामी सिनेमा 'तेरा इंतजार'चं टीझर नुकताच लागू करण्यात आला आहे. या सिनेमाच्या टीझरला लोकांनी बरीच पसंती दिली आहे. या सिनेमात अरबाज खान प्रमुख भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
पुणे























