एक्स्प्लोर

Box Office Collection : सिनेमाच्या पडद्याला सोन्याचे दिवस; जाणून घ्या 'गदर 2', 'जेलर', 'OMG 2' आणि 'घूमर'च्या कमाईबद्दल...

Movies : सिनेमाच्या पडद्याला चांगले दिवस आले असून अनेक सिनेमे कोट्यवधींची कमाई करत आहेत.

Gadar 2 Jailer OMG 2 Ghoomer Box Office Collection : मनोरंजनसृष्टी बहरलेली आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2), बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) 'जेलर' (Jailer), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) अभिनीत 'घूमर' (Ghoomer) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहेत. या सिनेमांसह 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva), 'मिशन इम्पॉसिबल' (Mission: Impossible), 'बार्बी' (Barbie), 'ओपनहायमर' (Oppenheimer), 'रॉकी और राणी की प्रेक कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) आणि 'ओह माय गॉड 2' (OMG 2) या सिनेमांचाही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.

मल्टिस्क्रीन असो किंवा सिंगल स्क्रीन असो... सगळी थिएटर सध्या प्रेक्षकांच्या धबधब्याने ओथंबून वाहत आहेत. प्रेक्षकांच्या इतक्या उड्या पडतायत की, सिनेमाच्या पडद्याला सध्या अक्षरश: सोन्याचे दिवस आले आहेत. खरंतर, गेल्या काही वर्षांत सिनेमे चालत नसल्याची ओरड होत होती. मात्र, 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva)  हा आपला मराठमोळा सिनेमा आला आणि थिएटर्सचा गल्लापण लयभारी होऊन गेला. 

परदेशातून आलेल्या 'मिशन इम्पॉसिबल' (Mission: Impossible) आणि 'बार्बी' (Barbie), 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सिनेमांनीही इम्पॉसिबल म्हणता येईल, एवढी कमाई केली. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनीही सिनेमाच्या खिडकीवर चांगलाच जलवा दाखवला. त्यानंतर आला, सनी पाजींचा (Sunny Deol) 'गदर 2'... ज्या दणक्यात 'गदर-2' (Gadar 2) मध्ये फायटिंग दाखवली गेली आहे, तितक्याच दणक्यात तिकीटबारीवरही गल्ल्याने धूमधडाका केला आहे. एकूणच, सध्या सिनेमांना सोन्याचे दिवस आले आहेत.

महाराष्ट्रासह देशातील सिनेमागृहांत प्रेक्षकांची रीघ

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.रिलीजच्या 11 दिवसांत भारतात या सिनेमाने (Jailer Box Office Collection) 280.85 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे जगभरात या सिनेमाने 507.4 कोटींची करत चांगलाच गल्ला जमवला आहे. रजनीकांत सिर्फ नाम ही काही है असं म्हणत चाहते त्यांच्या लाडक्या अण्णाचा सिनेमा पाहायला जात आहेत. 

एकीकडे दाक्षिणात्य सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला असतानाही बॉलिवूड सिनेमांची क्रेझही सिनेप्रेमींमध्ये कायम आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांचा 'ओएमजी 2' (OMG 2 Box Office Collection) या सिनेमाने 114.31 कोटींची कमाई केली आहे. तर साठी ओलांडलेल्या सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या 'गदर 2' (Gadar 2  Box Office Collection) या सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर 377.2 कोटींचा गल्ला जमवला आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा 'घूमर' (Ghoomer Box Office Collection) या सिनेमानेही रिलीजच्या तीन दिवसांत 3.47 कोटींची कमाई केली आहे.

संबंधित बातम्या

Box Office Collection : सनीचा 'गदर 2', रजनीकांतचा 'जेलर' अन् अक्षयचा 'OMG 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; अभिषेकच्या 'घूमर'चे आकडे मात्र निराशाजनक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget