Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट
Maa Tujhe Salaam 2 : सनी देओलच्या (Sunny Deol) 'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
'माँ तुझे सलाम 2'चं पोस्टर आऊट! (Maa Tujhe Salaam 2 Poster Out)
'माँ तुझे सलाम' (Maa Tujhhe Salaam) हा सिनेमा 25 जानेवारी 2002 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), तब्बू (Tabu), अरबाज खान (Arbaaz Khan) आणि टिन्नू वर्मा (Teenu Verma) मुख्य भूमिकेत होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam 2) या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे.
"दुध मांगोगे तो खीर देंगे,
— Atul Mohan (@atulmohanhere) August 20, 2023
कश्मीर मांगोगे तो लाहौर भी छीन लेंगे" - Major Pratap Singh
💥💥As promised, here's the BIG announcement💥💥
MAA TUJHE SALAAM 2 to go on floors soon. Get ready for another patriotic, action entertainer...coming soon in CINEMAS!#MaaTujheSalaam2… pic.twitter.com/QWHV1ncsFp
'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिनेविश्लेषक अतुल मोहन यांनी या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"दुध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगो तो लाहौर भी छीन लेंगे". लवकरच थरार, नाट्य आणि अॅक्शनचा तडका असणाऱ्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट करण्यात आलं आहे. 'माँ तुझे सलाम 2' हा सिनेमादेखील 500 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप या सिनेमासंदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही.
'गदर : एक प्रेम कथा' (Gadar Ek Prem Katha) हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 15 जून 2001 मध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाच्या रिलीजच्या सहा महिन्यांनंतर म्हणजेच 25 जानेवारी 2002 मध्ये 'माँ तुझे सलाम' हा सिनेमा रिलीज झाला. त्यावेळी हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. देशभक्ति दाखवणाऱ्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आता 'गदर 2' सिनेमाला मिळालेलं यश लक्षात घेत 'माँ तुझे सलाम'चा सीक्वेल रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. महेंद्र धारीवाल (Mahendra Dhariwal) या सिनेमाची निर्मिती करणार असल्याचं पोस्टरमध्ये दिसत आहे.
संबंधित बातम्या