एक्स्प्लोर

Sunil Shende Passed Away : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Sunil Shende : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे.

Sunil Shende Passed Away : मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Sunil Shende) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ अशा अनेक सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. 

सुनील शेंडे राहत्या घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विलेपार्ले येथील राहत्या घरीच रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सुनील शेंडे यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांत वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळेच त्यांना हरहुन्नरी अभिनेता म्हटले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस, राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या आहेत. 

नव्वदच्या दशकात सुनील शेंडे खूप लोकप्रिय होते. 'निवडुंग', 'मधुचंद्राची रात्र', 'जसा बाप तशी पोर', 'ईश्वर', 'नरसिम्हा' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत सुनील शेंडे यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही वेगळी छाप सोडली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. 

सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती सुनील शेंडे, दोन मुलं ऋषिकेश शेंडे आणि ओमकार शेंडे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुनील शेंडे यांनी सिनेमांसह अनेक नाटकांत आणि मालिकांमध्येदेखील काम केलं आहे. 

'गांधी' सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण!

'गांधी' या सिनेमाच्या माध्यमातून सुनील शेंडे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ते डाकूच्या भूमिकेत दिसले होते. 'पहला प्यार' या गाजलेल्या मालिकेचादेखील सुनील शेंडे भाग होते. मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटकांत काम केलं आहे. अष्टपैलू अभिनेते म्हणून ते ओळखले जायचे. 

आपल्या बहरदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुनील शेंडे यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शोक व्यक्त करत आहेत. 

संबंधित बातम्या

Siddhaanth Vir Surryavanshi: सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या पत्नीनं शेअर केली भावनिक पोस्ट; म्हणाली, 'जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ..'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्रManoj Jarange Patil : आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावं लागेल; मनोज जरांगे आक्रमकUddhav Thackeray : वायकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची मशाल! ठाकरे EXCLUSIVEABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांक किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Yogi Adityanath : 'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
'काँग्रेसमध्ये औरंगजेबाचा आत्मा घुसलाय, त्यांना जिझियासारखा कर लावायचाय', योगी आदित्यनाथ यांचा आरोप
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
कोकणात रानगव्याचा धुडगूस, आंबा बागांचं नुकसान; 2 गव्यांच्या भीतीने ग्रामस्थ त्रस्त
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Video: रवींद्र वायकर गद्दार, भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबुल केलंय; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Embed widget