एक्स्प्लोर
पहिल्याच दिवशी 'सुलतान'ची रेकॉर्डब्रेक कमाई
मुंबई : ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सुलतान सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळाली आहे. 'सुलतान'ने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. 'सुलतान' 36.54 कोटींसह यंदाच्या वर्षात पहिल्या दिवसात सर्वात मोठी कमाई सिनेमा ठरला आहे.
सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती दिली. पहिल्या दिवसाच्या कमाईमध्ये 'सुलतान'ने 6 रेकॉर्ड मोडले आहेत.
1) या सिनेमाने शाहरुखच्या 'फॅन'च्या पहिल्या दिवसाईच्या कमाईपेक्षा जवळपास दुप्पट कमाई केली आहे. फॅनने 19.20 कोटी कमावले होते.
'सुलतान'चे दहा सुपरहिट डायलॉग
2) ईदला रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये 'सुलतान' हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी शाहरुखच्या चेन्नई एक्प्रेस सिनेमाने 33.1 कोटी कमावले होते. 3) 'सुलतान' रिलीज होण्यापूर्वीच तीन दिवसांपासून अॅडव्हान बुकिंग सुरु होतं. सुमारे 20 कोटी रुपये अॅडव्हान्स बुकिंगमधून जमा झाले होते. यापूर्वी बजरंगी भाईजानसाठी मोठ्या प्रमाणात अॅडव्हान बुकिंग झालं होतं. त्याचा रेकॉर्ड 'सुलतान'ने मोडला आहे. 4) स्पोर्ट्सवर आधारित सिनेमाने पहिल्या दिवशी जेवढी कमाई केली, त्यापेक्षा अधिक कमाई 'सुलतान'ने केली आहे. यापूर्वी 'भाग मिल्खा भाग'ने 9 कोटी तर प्रियांका चोप्राच्या 'मेरी कोम'ने 8.4 कोटी कमावले होते. 5) यापूर्वी सलमानच्या प्रेम रतन धन पायो सिनेमाने पहिल्या दिवशी 40.35 कोटी कमाई केली होती. त्यानंतर सुलतानचा नंबर लागला आहे. 6) आतापर्यंत बुधवारी सलमानचे दोन सिनेमे रिलीज झाले आहेत. सुलतानपूर्वी एक था टायगर बुधवारी रिलीज झाला होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी 3.93 कोटीची कमाई केली होती.सुलतान का पाहावा?
7) सुलतान सिनेमासाठी 90 कोटींचा खर्च आला आहे. हा सिनेमा किमान चार आठवडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे.संबंधित बातम्या
फोटो - 'सुलतान'ची रेकॉर्डब्रेक कमाई
'सुलतान'चे दहा सुपरहिट डायलॉग
सुलतान का पाहावा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement