एक्स्प्लोर

Sukesh Chandrashekhar gifts Jacqueline Fernandez : एक यॉट, 100 आयफोन आणि बरंच काही...; सुकेशकडून जॅकलिनला बर्थडे गिफ्ट!

Sukesh Chandrashekhar Gifts Jacqueline Fernandez : तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त एक यॉट भेट दिली आहे. रविवारी (11 ऑगस्ट) रोजी जॅकलिनचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुकेशने ही घोषणा केली.

Sukesh Chandrashekhar Gifts Jacqueline Fernandez : दिल्लीत मनी लाँड्रिंग, घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) तिच्या वाढदिवसानिमित्त एक यॉट भेट दिली आहे. रविवारी (11 ऑगस्ट) रोजी जॅकलिनचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुकेशने ही घोषणा केली. सुकेशने जॅकलीनला गिफ्ट दिलेल्या यॉटलाही तिचेच  नाव देण्यात आले आहे. 

एका वृत्तानुसार, सुकेशने जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ही तीच यॉट आहे, जी सुकेशने 2021 मध्ये जॅकलिनसाठी निवडली होती. 'लेडी जॅकलिन' नावाची ही यॉट या महिन्यात डिलीव्हर होणार आहे. यॉटचे सर्व कर भरले गेले असून सगळा व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा सुकेशने केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Jacqueliene Fernandez (@jacquelienefernandez)

जॅकलीन प्राण्यांची देखभाल करण्यासासाठीही काम करते. याबाबत सुकेशने सांगितले की, त्याने जॅकलिनला बेंगळुरूमध्ये भेट दिलेले पेट हॉस्पिटल या वर्षी पूर्ण होत आहे. त्याशिवाय, सुकेशने जॅकलिनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वायनाड भूस्खलन पीडितांना 15 कोटी रुपये आणि 300 घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. जॅकलिनवर चित्रित केलेले 'यिम्मी यम्मी' हे गाणे सुपरहिट करण्यासाठी 100 आयफोन 15 प्रो देण्याची घोषणा केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Jacqueliene Fernandez (@jacquelienefernandez)

29 मे 2015 रोजी सुकेशवर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 (फसवणूक) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) आणि प्राइज चिट्स एवं मनी सर्कुलेशन स्कीम्स (प्रतिबंध) कायदा आणि ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या महाराष्ट्र संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयपीसीच्या काही कलमांखाली गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली होती. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्सही पाठवले होते. ईडीने तिची चौकशीदेखील केली. 

2022 मध्ये दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रानुसार, सुकेशने जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी काळ्या पैशाचा वापर केल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी करण्यात आली होती.

सुकेश चंद्रशेखर संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात डिसेंबर 2021 मध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचेही नाव समोर आले होते. यानंतर ईडीने तपास केल्यानंतर जॅकलीनलाही आरोपी केले होते. शिवाय जॅकलीनची या प्रकरणात अनेकदा चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर जॅकलीन आणि सुकेशच्या नात्याबाबत सर्वांना माहिती मिळाली होती. सुकेश तुरुंगात असताना जॅकलीन त्याला भेटण्यासाठी जात होती. सुकेशने तिला अनेक महागडे गिफ्ट दिले होते. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Thane Election BJP: ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?
ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Thane Election BJP: ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?
ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
Embed widget