एक्स्प्लोर

Stree 2 Teaser : सहा वर्षांनी ती परत येतेय...सोशल मीडियावर 'स्त्री 2' चा टीझर लाँच; प्रेक्षक म्हणाले, ओ स्त्री जल्दी आना!

Stree 2 Teaser : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर या जोडीचा सुपरहिट चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल असलेला 'स्त्री 2'चा टीझर ऑनलाईन लाँच करण्यात आला आहे.

Stree 2 Teaser :   राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या जोडीचा सुपरहिट चित्रपट 'स्त्री'चा सिक्वेल असलेला 'स्त्री 2'चा टीझर ऑनलाईन लाँच करण्यात आला आहे. या आधी 'मुंज्या'सोबत थिएटरमध्ये 'स्त्री 2'चा टीझर दाखवण्यात येत होता. आता ऑनलाईन, सोशल मीडियावरही  टीझर आऊट करण्यात आला आहे. 

'मुंज्या', 'भेडिया' आणि 'स्त्री' हे तिन्ही चित्रपट  दिनेश विजन यांच्या हॉरर कॉमेडी युनिवर्सचा भाग आहे. मॅडॉक फिल्म्सने चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या टीझरच्या व्हिडीओसोबत ''यावेळी स्वातंत्र्यदिनी चंदेरीमध्ये दहशत असेल. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लीजेंड पुन्हा येत आहे.''

कसा 'स्त्री-2'चा टीझर?

टीझरच्या सुरुवातीला चंदेरी गावातील एका महिलेची मोठी मूर्ती दाखवण्यात आली आहे. या मूर्तीवर लोक दूध अर्पण करत असतात. मूर्तीच्या चौथाऱ्यावर हे स्त्री आमचे रक्षण कर असे नमूद करण्यात आले आहे.  जी स्त्री पूर्वी चंदेरी गावातील लोकांना घाबरवायची, तीच आता त्यांचे रक्षण करू लागली आहे आणि आता लोक तिची देवीप्रमाणे पूजा करतात. पण यानंतर ट्रेलरमध्ये  ट्वीस्ट दाखवला आहे. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी काहीतरी आश्चर्याने पाहत आहेत आणि ''ही खरंच आलीय आता'' असे म्हणतात. 

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

'स्त्री-2' ची कथा कशी पुढे जाणार?

याशिवाय टीझर व्हिडिओमध्ये अनेक जम्प स्कॅनर सीन दाखवण्यात आले आहेत. श्रद्धा कपूर गंभीरपणे पाहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. 'स्त्री'च्या शेवटच्या भागाच्या श्रद्धा कपूरच 'स्त्री'ची वेणी सोबत घेऊन जाते, त्यानंतर आता काय होईल, हे स्त्री 2 दाखवण्यत आले आहे. 

एका सीनमध्ये, शहरातील सर्व पुरुष एका वर्तुळात उभे असल्याचे दाखवले आहे. याभोवती श्रद्धा कपूर तिची वेणी फिरवत फिरत आहे. निर्मात्यांनी कथेबद्दल अनेक संकेत दिले आहेत, परंतु खरी कथा ट्रेलर  प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.'स्त्री 2' च्या टीझरनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचे दिसत आहे. 

एका यूजरने लिहिले की, "ही स्त्री आमची फेव्हरेट आहे." हा टीझर व्हिडिओ लवकरच यूट्यूबवर अपलोड करण्याचे आवाहन अनेकांनी केले आहे. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की, ओ स्त्री, लवकर ये. या चित्रपटात एक आयटम नंबर देखील आहे. ज्यामध्ये तमन्ना भाटिया परफॉर्म करताना दाखवली आहे. त्यामुळे तमन्ना भाटिया या चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget