एक्स्प्लोर
श्रीदेवीच्या ऑनस्क्रीन बहिणीचं निधन
सुजाता यांना मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
मुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटात श्रीदेवीच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं. मागील काही काळापासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. सुजाता यांची बहिणी आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या निधनाची बातमी ट्विटरवर दिली.
सुजाता यांना मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांचा कॅन्सर अंतिम टप्प्यात पोहोचला होता. शिवाय शरीरातील अनेक अवयवही निकामी झाले होते.
सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी 18 ऑगस्टला बहिण सुजाता यांच्या आजारपणाची माहिती ट्विटरवर दिली होती. तेव्हा त्या आयसीयूमध्ये होत्या. त्यानंतर सुजाता यांनी 19 ऑगस्टला रात्री 11.26 वाजता जगाचा निरोप घेतल्याची माहिती सुचित्रा यांनी दिली. आयुष्य आता पहिल्यासारखं नसेल, असंही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
'इंग्लिश विंग्लिश'मधील सुजाता कुमार यांच्या कामाचं कौतुक झालं होतं. यानंतर त्यांच्याकडे अनेक चांगले चित्रपट आले होते. 'रांझणा', 'गोरी तेरे प्यार में' यासारख्या सिनेमात त्या दिसल्या. तसंच सुजाता यांनी अनेक टीव्ही शोमध्येही काम केलं होतं. यात 'हॉटेल किंग्स्टन', 'बॉम्बे टॉकिंग' आणि '24' यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement