![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sridevi Death Anniversary : बॉलिवूडची 'चांदनी'! कोट्यवधी मानधन घेणाऱ्या बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री, जाणून घ्या वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवींबद्दल...
Sridevi : बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
![Sridevi Death Anniversary : बॉलिवूडची 'चांदनी'! कोट्यवधी मानधन घेणाऱ्या बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री, जाणून घ्या वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवींबद्दल... Sridevi Death Anniversary know about bollywood Actress Sridevi special thing Sridevi Boney Kapoor Love Story movies Sridevi Death Anniversary : बॉलिवूडची 'चांदनी'! कोट्यवधी मानधन घेणाऱ्या बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री, जाणून घ्या वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवींबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/24/a9e89a13686d735449df6c1ccbd9114a1677205934860254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sridevi : बॉलिवूडची 'चांदनी' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या निधनाला (Death Anniversary) सहा वर्षे झाले असले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्या जिवंत आहेत. श्रीदेवी यांचे पूर्ण नाव 'श्री अम्मा यंगर अय्यप्पन' असे आहे. त्यांनी हिंदीसह, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेंतील सिनेमांत काम केलं आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी
श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूमधील मीनामपट्टी या गावात झाला. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी 'कंधन करुणई' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यानंतर 1972 साली 'रानी मेरा नाम' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी त्या नऊ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. 1996 साली श्रीदेवी सिनेनिर्माता बोनी कपूरसोबत लग्नबंधनात अडकल्या. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार, तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार, केरळ राज्य चित्रपट पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं असलं तरी 'हिम्महतवाला' या सिनेमाने त्यांना खरी ओळख मिळाली. या सिनेमामुळे त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. जितेंद्र आणि श्रीदेवीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाली. या सिनेमानंतर श्रीदेवी यांनी आपल्या सिनेमांत काम करावे, म्हणून अनेक निर्माते-दिग्दर्शक रांगा लावायचे.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लव्हस्टोरी (Sridevi Boney Kapoor Love Story)
'मिस्टर इंडिया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मैत्री झाली. बोनी आणि श्रीदेवी यांच्यात भावा-बहिणीचं नातं आहे असं बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीला वाटत होते. पण श्रीदेवी गरोदर राहिल्या आणि बोनी कपूरमुळे त्या गरोदर आहेत हे त्यांच्या पहिल्या पत्नीला कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि श्रीदेवींसोबत लग्न केलं.
50 वर्षांत 300 सिनेमे
श्रीदेवी यांनी तीन दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यादरम्यान त्यांनी 300 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 63 हिंदी, 62 तेलुगू, 58 तामिळ आणि 21 मल्याळम सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. बोनी कपूरसोबत लग्न झाल्यानंतर श्रीदेवी सिनेसृष्टीापासून लांब राहिल्या. त्यानंतर 2012 साली 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक केलं. लग्नानंतर मुख्य भूमिकेत पदार्पण करणाऱ्या श्रीदेवी या पहिल्या अभिनेत्री होत्या.
80 च्या दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत श्रीवेंची गणना होते. 'मिस्टर इंडिया' या सिनेमासाठी त्यांनी 11 लाख मानधन घेतलं रेकॉर्ड ब्रेक केला होता. त्यानंतर 80-90 च्या दशकात एका सिनेमासाठी त्या 1 कोटी मानधन घेऊ लागल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
'शेवटचा फोटो'; श्रीदेवींच्या आठवणीत बोनी कपूर झाले भावूक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)