एक्स्प्लोर
Advertisement
जोड्या जुळवल्या जाणं खूपच कॉमन! बुमराहसोबत अफेअरच्या चर्चा अनुपमाने धुडकावल्या
लोकं जोड्या जुळवतात, पण आम्ही फक्त 'चांगले मित्र' आहोत, असं म्हणत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम हिने गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत डेटिंगच्या चर्चा उडवून लावल्या
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम हिने टीम इंडियाचा धडाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत अफेअर असल्याच्या चर्चा धुडकावल्या आहेत. जोड्या जुळवल्या जाण्यात काहीच नवल नाही, अशी प्रतिक्रियाही अनुपमाने दिली आहे. आम्ही फक्त 'चांगले मित्र' आहोत, असं सांगायला ती विसरली नाही.
बुमराहला डेट करत नसल्याचं अनुपमाने सांगितल्याचा दावा 'पिंकविला' या इंग्रजी वेबसाईटने केला आहे. 'प्रेमम' या मल्ल्याळम चित्रपटामुळे अनुपमा प्रकाशझोतात आली. तिने तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. जसप्रीत आणि अनुपमा यांनी ट्विटरवर एकमेकांना फॉलो करायला सुरुवात केल्यानंतर चाहत्यांच्या माना वळल्या होत्या.
जसप्रीत बुमराह सध्या आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकातील आठ सामन्यांमध्ये त्याने कमाल कामगिरी बजावली आहे. बुमराहने आतापर्यंत विश्वचषकात 17 विकेट्स घेतल्या आहेत. 25 वर्षांच्या या युवा क्रिकेटपटूसाठी स्टेडियममध्ये बसलेल्या फॅन्सकडून 'माझ्याशी लग्न कर' असे फलकही झळकावले जातात.
बुमराहचं नाव यापूर्वी अभिनेत्री राशी खन्नासोबतही जोडलं गेलं होतं. 'मी जसप्रीतला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. आम्ही कधी भेटलोही नाही. तो क्रिकेटर आहे, एवढंच मला माहित आहे.' असं राशीने सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रीडा
निवडणूक
Advertisement