Sooryavanshi Release Date | ठरलं... 'या' दिवशी 'सूर्यवंशी' प्रेक्षकांच्या भेटीला, तारिख जाहीर
बहुचर्चित सूर्यवंशी चित्रपटाची नवी तारीख ठरली असून अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांनी आपला अॅक्शन चित्रपट 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. 30 एप्रिल रोजी 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Sooryavanshi Release Date | ठरलं... 'या' दिवशी 'सूर्यवंशी' प्रेक्षकांच्या भेटीला, तारिख जाहीर Sooryavanshi Release Date akshay kumar announces the release date of sooryavansi know here Sooryavanshi Release Date | ठरलं... 'या' दिवशी 'सूर्यवंशी' प्रेक्षकांच्या भेटीला, तारिख जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/14/28df9c11417322f81dfa21413517e974_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sooryavanshi Release Date : चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांनी आपला अॅक्शन चित्रपट 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. कलाकारांनी सोशल मीडियामार्फत सांगितलं की, दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. दोघांनीही टीझरचा व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं की, गेल्या वर्षी याच दिवशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे चित्रपट प्रदर्शित होण्यास उशिर झाला.
दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, "वचन नेहमी वचन असतं. आम्ही तुम्हाला 'सूर्यवंशी' चित्रपटगृहात दाखवणार असल्याचं वचन दिलं होतं. आणि ते वचन आम्ही पूर्ण करतोय. शेवटी प्रतिक्षा संपली आहे! पोलीस येत आहेत... सूर्यवंशी चित्रपटगृहांमध्ये 30 एप्रिल 2021 रोजी रिलीज करण्यात येईल."
रोहित शेट्टीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अक्षय कुमारनं त्याच्यासाठी एक खास पोस्टही शेअर कली. त्यांनी सूर्यवंशीच्या सेटवरील दोघांचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं की, "रोहितसोबत काम करणं सर्वात सोपं होतं कारण आम्हा दोघांमध्ये एका गोष्टीबाबत आवड आहे, ती म्हणजे अॅक्शन! वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहित, तुला अॅक्शनने भरलेल्या पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा."
दरम्यान, अक्षय कुमारसोबतच रणवीर सिंह, अजय देवगण आणि कतरिना कैफ यांचाही समावेश आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुनही चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- लेकीनं शेअर केला नीना गुप्ता, विवियन रिचर्ड्स यांचा Unseen Photo
- जॅकलिनचा टॉपलेस फोटो पाहून चुकला 'या' अभिनेत्याच्या काळजाचा ठोका
- जग्गू दादाचा साधेपणा; घरकाम करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जॅकी श्रॉफ पोहोचले मावळात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)