लेकीनं शेअर केला नीना गुप्ता, विवियन रिचर्ड्स यांचा Unseen Photo
मसाबा गुप्ता ही मागील काही दिवसांपासून तिच्या एका फोटोशूटमुळं कमालीची चर्चेत आली आहे. त्यादरम्यानंच तिनं केलेली ही सोशल मीडिया पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे.
मुंबई : सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही मागील काही दिवसांपासून तिच्या एका सुरेखशा फोटोशूटसाठी चर्चेत आली आहे. सब्यसाची मुखर्जी याच्या डिझायनर कलेक्शनसाठी मसाबानं मॉडेलिंग केलं आणि पाहता पाहता तिचे फोटो व्हायरल झाले. माबाच्या या फोटोंवरुन नजर हटत नाही, तोच तिच्या आणखी एका फोटोनं सर्वांच्या नदरा वळवल्या आहेत.
मसाबानं पोस्ट केलेला हा फोटो तिच्या कुटुंबाता. अर्थात तिचे आई आणि वडील दोघंही या फोटोमध्ये दिसत आहेत. अभिनेत्री नीना गुप्ता या क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांचं हे नातं सर्वज्ञात होतं. या दोघांनीही लग्न केलं नाही, पण तरीही त्यांना या नात्यातून एक मुलगी आहे. ही मुलगी म्हणजेच मसाबा.
In Pics | Wedding shoot च्या निमित्तानं नीना गुप्तांच्या लेकीचा अनोखा थाट
माझं रक्त.... माझं जग.... असं इंग्रजीतून कॅप्शन लिहित मसाबानं या फोटोप्रती असणारी तिची आपुलकी व्यक्त केली. तिचं हे लहानसं कॅप्शनच खुप काही सांगून गेलं. मसाबा आणि नीना गुप्ता यांच्यापासून विवियन रिचर्ड्स दूर असते तरीही या कुटुंबाच्या त्रिकोणाची आकृती मात्र त्यांच्याशिवाय अपूर्णच हेच ही पोस्ट पाहताना लक्षात येत आहे.
View this post on Instagram
सहसा सेलिब्रिटी हे त्यांच्या खासही जीवनामुळंही चर्चेचा विषय ठरतात. मसाबा आणि नीना गुप्ता यांच्या खासगी जीवनाबाबतही बऱ्याच चर्चा आणि कुतूहल पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या दोघींही विवियन यांच्यासोबतचं त्यांचं नातं कायमच सुरेखरित्या सर्वांसमोर आणलं.