जॅकलिनचा टॉपलेस फोटो पाहून चुकला 'या' अभिनेत्याच्या काळजाचा ठोका
सोशल मीडियावर पोस्ट केलेला तिचा हा फोटो सध्या फक्त कलाकार मंडळीच नव्हे तर, असंख्य चाहत्यांच्या काळजाचाही ठोका चुकवत आहे.

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, म्हणजेच बॉलिवूडची श्रीलंकन ब्युटी म्हणून ओळखली जाणारी सौंदर्यवती. जॅकलिननं कायमच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. अवघ्या कमी काळातच तिला हिंदी काविश्वात भक्कम स्थान निर्माण करण्यात यश मिळालं.
रुपेरी पडद्यावर ज्याप्रमाणं जॅकलिनच्या भूमिकांना प्रेक्षक दाद देतात, त्याचप्रमाणं सोशल मीडियावरही तिच्या अदांवर फिदा असणाऱ्यांचा आकडा नाही. याची प्रचिती तिनं नुकत्याच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टकडे पाहून येत आहे.
जॅकिनं नुकताच तिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. कॅमेऱ्याकडे रोखलेली तिची नजर खुप काही बोलून जात आहे. ब्लॅकअॅण्ड व्हाईट फिल्टर असणारा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी, फॉलोअर्सनी या अभिनेत्रीच्या मादक सौंदर्याची प्रशंसा केली आहे.
जॅकलिनची ही पोस्ट पाहून अभिनेता आणि सूत्रसंचालक मनीष पॉल यालासुद्धा प्रतिक्रिया देण्यापासून थांबता आलं नाही. आगीच्या ज्वालांचं चिन्हं/ इमोजी त्यानं कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केलं.
View this post on Instagram
बॉलिवूडमधील या सौंदर्यवतीच्या आगामी चित्रपटांबाबत सांगावं तर, 'बच्चन पांडे' या चित्रपटाचं राजस्थानमधील चित्रीकरण तिनं नुकतंच पूर्ण केलं. तिनं चित्रपटाच्या सेटवरील फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबत जॅकलिन स्क्रीन शेअर करणार आहे.























