एक्स्प्लोर

...तर सूर्यवंशी आणि 83 हे दोन्ही ओटीटीवर येणार!

सूर्यवंशी आणि 83 या दोन सिनेमांनी थिएटरवर रिलीज व्हायची हमी दिल्यावर थिएटरवाले निश्चिंत झाले. पण आता मात्र जरा चिंतेचं वातावरण थिएटरवाल्यांमध्ये पसरलं आहे.

मुंबई : लॉकडाऊन काळात थिएटर्स बंद झाली. थिएटर लॉबीला वाटलं काही महिन्यांनी थिएटर्स उघडतील. पण हा काळ खूप पुढे पुढे जाऊ लागला. तसा सिनेनिर्मात्यांनी ओटीटीचा प्लॅटफॉर्म जवळ केला. यावर थिएटर लॉबी नाराज झाली. त्यांचं म्हणणं होतं, इतके दिवस आम्ही तुमचे सिनेमे रिलीज केले. पण आता दिवस वाईट आहेत तर तुम्ही ओटीटीला का जवळ करता? अनेकांनी ओटीटीचं समर्थन केलं. पण दोन सिनेमे मात्र म्हणाले आम्ही थिएटरवरच रिलीज करू सिनेमा. हे दोन सिनेमे होते सूर्यवंशी आणि 83. या दोन सिनेमांनी थिएटरवर रिलीज व्हायची हमी दिल्यावर थिएटरवाले निश्चिंत झाले. पण आता मात्र जरा चिंतेचं वातावरण थिएटरवाल्यांमध्ये पसरलं आहे.

सूर्यंवशी आणि 83 हे दोन्ही सिनेमे थिएटरवर न येता ओटीटीवर येऊ शकतात. रिलायन्स एंटरटेन्मेंटच्या गोटातून याची चाचपणी सुरू झाली आहे. थिएटर्स जर दिवाळी किंवा जास्तीत जास्त नाताळपर्यंत उघडण्याची शक्यता दिसेनाशी झाली तर मात्र हे दोन्ही सिनेमे ओटीटीवर येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सिनेमांबद्दल कमालीची उत्सुकता आहे, त्यामुळे ओटीटी वाल्यांनीही मोठी ऑफर या सिनेमांसमोर ठेवली आहे. पण येत्या काही दिवसांत थिएटर्स दिवाळीत उघडणार की नाही ते कळल्यानंतर पुढची पावलं उचलली जाणार आहेत. रिलायन्स एंटरटेन्मेंटचे सुभाशीष सरकार यांनीही बोलताना याचं सुतेवाच केलं आहे. दिवाळी, नाताळपर्यंत थिएटर उघडत नसतील तर हे सिनेमे ओटीटीवर यायची शक्यता आहे, असं ते म्हणतात.

सूर्यवंशी या चित्रपटात अक्षयकुमारची भूमिका असून, रोहित शेट्टीचा सिम्बानंतरचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंगही असल्याचं त्याच्या प्रोमोमधून कळतं. त्यामुळे सिनेप्रेमींचं या सिनेमावर लक्ष आहे. तर दुसरीकडे 83 हा चित्रपट भारताने जिंकलेल्या वर्ल्डकपवर बेतला असल्याने त्याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. त्यात रणवीर सिंगची मुख्य भूमिका असून, दिपिका पडुकोण, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील यांच्याही भूमिका आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget