एक्स्प्लोर
सोनम कपूर-आनंद अहुजा एप्रिलमध्येच विवाहबंधनात?
मेहंदी, संगीत, लग्न असे विविध सोहळे मुंबईतच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर अवघ्या काही दिवसात विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात सोनम बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत लगीनगाठ बांधण्याची चिन्हं आहेत.
मेहंदी, संगीत, लग्न असे विविध सोहळे मुंबईतच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 8 ते 12 मे दरम्यान सोनमचा विवाहसोहळा रंगण्याचे संकेत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये तर सोनम 29 एप्रिलच्या मुहूर्तावरच लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे.
सोनम आणि आनंद जीनिव्हामध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, आता दोघंही मुंबईतच विवाहबद्ध होण्याची चिन्हं आहेत.
सोनमची काकी म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांचं फेब्रुवारीमध्ये निधन झालं. त्यामुळे कपूर कुटुंबीय काहीसं दुःखात होतं. सोनमच्या लग्नाच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय पुन्हा उत्साहात असेल.
आनंद अहुजा आणि सोनम कपूर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. दोघं जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातं. अनेक पार्ट्यांनाही दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे.
आनंद अहुजा अॅपरल्स व्यवसायात असून सोनम त्याच्या ब्रँडचं प्रमोशन करताना वारंवार दिसते. मात्र लव्ह लाईफविषयी छेडलं असता सोनम आपल्या खाजगी आयुष्यावर बोलणं टाळते.
जानेवारी महिन्यात सोनम आनंदच्या आईसोबत कोलकात्यात ज्वेलरी शॉपिंग करताना दिसली होती. त्यामुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सोनम लवकरच 'वीरे दी वेडिंग' या होम प्रॉडक्शन चित्रपटात दिसणार आहे. करिना कपूर-खानही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement