Smriti Irani Daughter Wedding : स्मृती इराणींची लेक लग्नबंधनात अडकली! 500 वर्ष जुन्या किल्ल्यात शनेल-अर्जुनचा शाही विवाहसोहळा संपन्न
Shanelle Irani Wedding : स्मृती इराणी (Smriti Irani) आणि जुबिन इराणी (Zubin Irani) यांची लेक शनेल इराणी नुकतीच अर्जुन भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
Smriti Irani Daughter Shanelle Irani Wedding First Picture : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) आणि जुबिन इराणी (Zubin Irani) यांची लेक शनेल इराणी (Shanelle Irani) नुकतीच अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla) लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. उत्कृष्ट फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईने किल्ला उजळला होता.
लग्नसोहळ्याच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न
शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्यात इराणी आणि भल्ला कुटुंबीय उपस्थित होते. राजस्थानची संस्कृती ही या लग्नसोहळ्याची थीम होती. त्यामुळे या लग्नसोहळ्यात राजस्थानी पदार्थांची मेजवानी होती. तसेच शनेल आणि अर्जुनने राजस्थानी पद्धतीचे कपडे परिधान केले होते. त्यामुळे एकंदरीत या लग्नसोहळ्याच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यात राजस्थानी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत.
थाटामाटात पार पडला शाही विवाहसोहळा! (Shanelle Irani Arjun Bhalla Wedding First Picture)
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Leader Smriti Irani) आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होत्या. शनेल आणि अर्जुनने (Shanelle Irani Arjun Bhalla Wedding) लग्नात डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान शनेल आणि अर्जुनचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. दोघेही त्यांच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होते. सध्या त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शनेल-अर्जुनचं ग्रॅंड रिसेप्शन 'या' ठिकाणी होणार
शनेल आणि अर्जुनने लग्नाप्रमाणे रिसेप्शनसाठीदेखील एका खास जागेची निवड केली आहे. एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांच्या ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. लग्नसोहळा राजस्थानमध्ये पार पडला आहे. त्यामुळे रिसेप्शन नक्की कुठे असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
स्मृती इराणी यांचा जावई कोण आहे?
स्मृती इराणी यांचा जावई अर्जुन भल्लाचा जन्म जन्म कॅनडातील टोरंटो येथे झाला आहे. त्याचे शालेय शिक्षण कॅनडातील सेन्ट रॉबर्ट कॅथोलिक हायस्कूलमध्ये झालं आहे. त्यानंतर त्याने लिसेस्टर विद्यापीठातून एलएलबी केलं. 2014 साली त्याने कॅनडामध्ये अकाऊंट मॅनेजर म्हणून काम केलं आहे. सध्या अर्जुन लंडनमध्ये एमबीएचं (MBA) शिक्षण घेत आहे.
संबंधित बातम्या