Bollywood Kissa : लाखो तरुणींच्या 'दिल की धडकन', सेल्समनचं काम करणारा गायक आज आहे कोट्यवधींचा मालक, वाचा सविस्तर
Shaan Life Story : 2000 च्या दशकात गायक शाननं त्याच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलं होतं. एकेकाळी सेल्समनचं काम करणारा हा अभिनेता आज कोट्यवधींचा मालक आहे.
Singer Shaan Life Story : आपल्या गोड आवाजाने लाखो चाहत्यांना वेड लावणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक शान मुखर्जी याने वयाच्या 17 व्या वर्षी करियरला सुरुवात केली. 2000 च्या दशकात शाननं त्याच्या आवाजाने चाहत्यांना वेड लावलं होतं, तितकाच तो हँडसमही असल्यामुळे तरुणी त्याच्या मागे वेड्या होत्या. गायक शान मुखर्जी 53 वर्षांचा आहे मात्र, त्याचा आवाज आणि त्याची पर्सनॅलिटी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी आहे.
सेल्समनचं काम करुन घालवले दिवस
फिल्मी दुनियेत नाव कमवणं आणि आपला पगडा राखणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. पण, इंडस्ट्रीमध्ये खूप संघर्ष केल्यानंतर त्याने स्वत:ची वेगळी जागा चाहत्यांच्या मनात निर्माण केली आहे, जी कायम आहे. शानचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा येथे झाला. शानचं खरं नाव शंतनू मुखर्जी असून त्याचा जन्म बंगाली कुटुंबात झाला. आज कोट्यवधींचा मालक असलेल्या शाननं एकेकाळी पोट भरण्यासाठी मिळेल ती छोटी-मोठी नोकरीही केली.
हा गायक आज आहे कोट्यवधींचा मालक
शानचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. 1989 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी करिअरला सुरुवात करणाऱ्या शानने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त बंगाली, उर्दू आणि कन्नड भाषांमध्येही आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. शानने 'सारेगामापा', 'सारेगामापा - लिटिल चॅम्प्स', 'स्टार व्हॉईस ऑफ इंडिया' सारखे संगीत रिॲलिटी शो देखील होस्ट केले आहेत. त्यासोबत त्याने चित्रपटात अभिनयही केला आहे.
संगीत कारकिर्द असलेल्या कुटुंबात शानचा जन्म
शानचे वडील दिवंगत मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते. त्याचबरोबर शानची बहीण सागरिकाही बॉलिवूड सिंगर आहे. शान 13 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांच्या निधनानंतर, त्याची आई मानसी मुखर्जी यांनी गायिका म्हणून काम केले आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली. शानने 2000 मध्ये राधिकाशी लग्न केलं, त्यांना सोहम आणि शुभ नावाची दोन मुले आहेत.
जिंगल्सने करिअरला सुरुवात
शान लहानपणी जाहिरातींसाठी जिंगल्स गाायचा. यानंतर त्याने गाण्यांना रि-मिक्स करण्यासाठी आवाज देण्यास सुरुवात केली. आरडी बर्मन यांच्या 'रूप तेरा मस्ताना..' या गाण्याचे री-मिक्स गाऊन शान प्रसिद्धीच्या झोतात आला. 2000 मध्ये, 'तन्हा दिल' या अल्बमसाठी त्याला MTV एशिया म्युझिकचा सर्वोत्कृष्ट सोलो अल्बम पुरस्कार मिळाला. शानने आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. शानला 5 वेळा सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :