Singer KK Net Worth : लक्झरी लाईफ जगत होता केके, सोबत होता अलिशान गाड्यांचा ताफा
Singer KK Net Worth : गायक केके कोट्यवधींचा मालक आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
Singer KK Net Worth : गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. केके यांनी 'दिल इबादत', 'तडप तडप', 'दस बहाने' अशा अनेक गाण्यांना आपला आवाज देऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. केके यांना गाण्यांसोबत गाड्यांचीदेखील आवड होती. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे. त्याने नुकतीच त्याने नवीन कार विकत घेतली होती.
अनेक भाषेत गायली गाणी
केके हा मुळचा दिल्लीचा रहिवासी होता. केके यांनी तामिळ, तेलुगी, कन्नड, मराठी, मल्याळम, बंगली आणि गुजराती अशा अनेक भाषेत गाणी गायली आहेत. केके यांना सर्वच भाषेत गाणी गाण्याची आवड होती. त्यामुळे त्यांची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. केके लाईव्ह कॉन्सर्टदेखील करायचे. एका लाईव्ह कॉन्सर्टचे केके 10 ते 15 लाख मानधन घ्यायचे. तर एका गाण्यासाठी ते पाच ते सहा लाख मानधन घेत होते.
करोडोंच्या संपत्तीचे केके होते मालक
केके यांचे घर खूपच आलिशान आहे. केकेला घोडेस्वारीचादेखील शौक होता. रिपोर्टनुसार, केके जवळजवळ 50 कोटींच्या संपत्तीचा मालक होता. केके यांच्या पश्चात पत्नी ज्योती कृष्णा आणि तमारा आणि नकुल ही दोन मुले आहेत.
आलिशान गाड्यांची आवड
केके यांना आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये जीप चेरोकी, मर्सिडीज बेंझ ए क्लास आणि ऑडी आरएस 5 या गाड्यांचा समावेश होता. केके यांनी नुकतीच ऑडी आरएस 5 (Audi RS5) ही गाडी विकत घेतली होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
संबंधित बातम्या