एक्स्प्लोर
Advertisement
'सिम्बा' छप्परफाड! रणवीरचा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला सिनेमा
आतापर्यंत रणवीर सिंगच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी केलेल्या कमाईत सिम्बा अव्वल ठरला आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत'ने 19 कोटी कमावले होते
मुंबई : रणवीर सिंगच्या बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे. 'सिम्बा'ने पहिल्या दिवशी भारतात 20.72 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. सिम्बा हा रणवीरची भूमिका असलेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह आणि सैफची मुलगी सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या शेवटी 'सिंघम' अजय देवगनचं दर्शन घडतं, तर पुढच्या भागात 'वीर रघुवंशी' म्हणून अक्षय कुमार झळकणार असल्याचंही रोहित शेट्टीने जाहीर केलं आहे.
आशुतोष राणा, व्रजेश हिर्जी, सोनू सूद, सुलभा आर्य यासारखे दिग्गज कलाकारही 'सिम्बा'मध्ये झळकले आहेत. त्याशिवाय सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सौरभ गोखले, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, नेहा महाजन अशा अनेक मराठी कलाकारांची फौजही सिनेमात पाहायला मिळत आहे.
पहिल्या दिवसाच्या कमाईत 'सिम्बा'ने शाहरुख खानच्या 'झीरो' चित्रपटालाही मागे टाकलं. 'झीरो'ने पहिल्या दिवशी 20.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी रणवीर सिंगने वेगवेगळ्या सिनेमागृहांमध्ये जाऊन प्रमोशन केलं होतं. शाळा-कॉलेजेसना नाताळच्या सुट्ट्या असल्याने सिम्बाला फायदा झाल्याची शक्यता आहे. प्रेक्षकांसोबत समीक्षकांनीही 'सिम्बा'वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.#Simmba gathered momentum during the course of the day, with evening/night shows supporting the film... Mumbai circuit is rocking... Emerges Ranveer Singh’s biggest opening day... Day 2 performing better than Day 1... Fri ₹ 20.72 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 29, 2018
रिव्ह्यू : सिम्बा
आतापर्यंत रणवीर सिंगच्या सिनेमांनी पहिल्या दिवशी केलेल्या कमाईत सिम्बा अव्वल ठरला आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत'ने 19 कोटी, 'गुंडे'ने 16.12 कोटी, 'गोलीयों की रासलीला- रामलीला'ने 16 कोटी, 'बाजीराव मस्तानी'ने 12.80 कोटी कमावले होते.80 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा जगभरात चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. पहिल्या वीकेंडला हा सिनेमा 50 कोटींचे आकडे पार करतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.Ranveer Singh - Opening Day biz... 1. #Simmba ₹ 20.72 cr 2. #Padmaavat ₹ 19 cr [Thu] 3. #Gunday ₹ 16.12 cr 4. #GoliyonKiRaasleelaRamLeela ₹ 16 cr 5. #BajiraoMastani ₹ 12.80 cr India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 29, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement