Sidharth Malhotra Kiara Advani Wedding: कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, 'कबीर सिंह...'
आता कियारा (Kiara Advani) आणि सिद्धार्थ (Sidharth Malhotra) यांच्या लग्नसोहळ्यानंतर काही नेटकरी सोशल मीडियावर मीम्स शेअर करत आहेत. या मीम्समध्ये अनेकांनी कबीर सिंहचा उल्लेख केला आहे.
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding: बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचा विवाह सोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan), अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif),करण जौहर (Karan Johar) या सेलिब्रिटींनी कियारा आणि सिद्धार्थ यांना शुभेच्छा दिल्या. आता कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नसोहळ्यानंतर काही नेटकरी सोशल मीडियावर मीम्स शेअर करत आहेत. या मीम्समध्ये अनेकांनी कबीर सिंहचा उल्लेख केला आहे.
नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स: (Memes Viral On Social Media)
एका नेटकऱ्यानं कबीर सिंह चित्रपटामधील शाहिद कपूरचा फोटो शेअर करुन लिहिलं, 'जेव्हा त्यानं सिद्धार्थ आणि कियारा (Kiara Advani) यांचं लग्न पाहिलं.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कबिर सिंह (kabir singh) चित्रपटामधील एका सिन्सचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन लिहिलं, 'प्रिती तू कबीर सिंहसोबत असं कसं करु शकतेस?'
When he sees #KiaraSidharthwedding.
— Saikat Das (@thesaikatdas) February 8, 2023
Kabir Singh: pic.twitter.com/mKqFM1SL2l
कबीर सिंह या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांनी प्रमुख भूमिका साकरली आहे. हा चित्रपट 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपटामध्ये शाहिदनं (Shahid kapoor) कबीर ही भूमिका साकारली तर कियारानं प्रिती ही भूमिका साकारली. या चित्रपटामधील कियारा आणि प्रितीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम 'पिंक अँड व्हाईट' अशी होती. वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू पक्षातील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी' चा अवलंब करण्यात आला आहे. कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनादेखील लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सिद्धार्थचा 'मिशन मजनू' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या दोघांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या