Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: शुभमंगल सावधान! सिद्धार्थ आणि कियाराचा विवाह सोहळा संपन्न; राजस्थानमध्ये घेतले सात फेरे
कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले.

Sidharth Malhotra, Kiara Advani wedding: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचा विवाह सोहळा पार पडला (Sidharth Malhotra, Kiara Advani wedding) आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला. त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम 'पिंक अँड व्हाईट' अशी होती. वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू पक्षातील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते. रिपोर्टनुसार, लग्नसोहळ्यासाठी कियारानं पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरची डिझायनर शेरवानी परिधान केली होती.
संध्याकाळी 5 वाजता कियारा आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांना हार घातले आणि 6 वाजता त्यांनी सात फेरे घेतले. त्यानंतर सिद्धार्थ आणि कियारानं लग्नसोहळ्याला उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियारा यांची वेडिंग रिसेप्शन पार्टी रात्री 9 वाजता सुरु होणार आहे.
लग्नासोहळ्याला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या विवाह सोहळ्याला करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, जूही चावला, मनीष मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेले आऊटफिट परिधान केले होते. या लग्नाला 100 ते 150 लोक उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
It's official! Sidharth Malhotra, Kiara Advani are now married
— ANI Digital (@ani_digital) February 7, 2023
Read @ANI Story | https://t.co/9hhnWRlasN#SidharthMalhotra #KiaraAdvani #SidKiara #BollywoodWedding pic.twitter.com/7W2HMe7ayK
कियारा-सिद्धार्थच्या लग्नात 'नो फोन पॉलिसी'
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी' चा अवलंब करण्यात आला आहे. कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनादेखील लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सिद्धार्थ आणि कियाराचे चित्रपट
सिद्धार्थचा 'मिशन मजनू' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थचा 'योद्धा' हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कियारा आडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या दोघांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
